DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कोरोना संकटात मनमानी करणा-या खाजगी शाळांविरुद्ध खडकवासला भाजयुमोतर्फे आंदोलन

विविध मागण्यांचे शाळांना दिले निवेदनः सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

DD News Marathi by DD News Marathi
May 28, 2021
in ताज्या बातम्या
0
कोरोना संकटात मनमानी करणा-या खाजगी शाळांविरुद्ध खडकवासला भाजयुमोतर्फे आंदोलन

खडकवासला प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. २८ मे २०२१

कोरोना महामारीच्या संकट काळात शाळा बंद असतानाही काही खासगी शाळांनी पालकांकडून जबरदस्तीने फी वसूल करण्याचा तगादा लावला असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही शाळांनी विद्यार्थ्यांचे Leaving Certificate पालकांना घरी पाठवले आहेत, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेमधून काढण्याच्या धमक्या पालकांना दिल्या जात आहेत, काही शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ चे विद्यार्थ्यांचे निकाल दिले नाहीत, काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे Online Classes बंद केले आहेत तर काही शाळांनी चक्क फि वसुलीच्या नोटीस पालकांना पाठवल्या आहेत अशा खाजगी शाळांच्या कारभाराविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा खडकवासला विभागाच्या वतीने निवेदने देऊन सनदशीर मार्गाने आवाज उठविला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांच्या सूचनेनुसार, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सचिन बदक यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला विधानसभा मतदार संघातील विविध शाळांमध्ये जाऊन निवेदने देण्यात आली आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ मधील शैक्षणिक शुल्क संदर्भात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

१. कोणत्याही विद्यार्थ्यांस फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवू नका.
२. फी भरण्यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च नायालयाने निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुलभ हप्त्याने फी भरण्याची मुभा मिळावी.
३. उशिरा फी भरणाऱ्या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा अर्थिक दंड आकारू नये.
४. मुलांचे Online शिक्षण बंद केले जाऊ नये.
५. ज्या शालेय सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी या वर्षात केला नाही त्याबाबत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नये. उदा. ग्राऊंड शुल्क, कॅाम्प्युटर लॅब, वाहतुक शुल्क, इतर.
६. शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्यांची गुणपत्रिका अथवा शाळा सोडल्याचा दाखला आडवू नये.
७. यदाकदाचित आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील कर्ता व्यक्ती COVID मुळे दगावला असेल तर अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी.

वरील सर्व मागण्यांचा शाळांनी गांभीर्याने विचार करावा अशी नम्र विनंती केली आहे. जर कोणत्याही शाळेची वरील विषयातील तक्रार प्राप्त झाल्यास तीव्र आंदोलनाचा पुकारण्यात येईल असा इशारा आमदार भीमराव तापकीर व सचिन बदक यांनी दिला आहे.

या आंदोलनात आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षाताई तापकीर, वृषालीताई चौधरी, खडकवासला मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी नगरसेविका मोहिनीताई देवकर, स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश वरपे, सरचिटणीस अभिजीत धावडे, उपाध्यक्ष महेश भोसले, किरण हगवणे, दत्तात्रय चौधरी, संजय वर्मा, सुप्रिया भुमकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अनिरुद्ध कोकणे, विशाल उभे, विक्रांत तापकीर, सुशांत कुटे, बापू सर पाटील,निखिल धावडे, किरण मारणे, अशोक कोंडे, रितेश रासकर, गणेश पोकळे, अमोल ठाकर, गणेश देशमुख, प्रतिक जोशी, अभिजित धुमाळ, कृष्णा भंडारी, ओंकार डवरी, संकेत बिरामणे, प्रविण वनशीव, विराज जाधव, अक्षय ढाकणे, शुभम आढाव, अमित तारू, निखिल दांगट, आकाश पवार, उमेश भोसले, अमेय शिंदे हे सहभागी झाले होते.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

तूम्ही ही होऊ शकता ‘हनी ट्रॅप’चा बळीः ‘हनी ट्रॅप’ नेमकं आहे तरी काय ?

Next Post

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.