DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या ‘त्या’ प्रकरणाचा निकाल मंगळवारी!

हे प्रकरण नेमकं काय आहे?

DD News Marathi by DD News Marathi
January 21, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या ‘त्या’ प्रकरणाचा निकाल मंगळवारी!

सोलापूर प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२५

राज्यभर चर्चेत असलेल्या कराड प्रकरणाचे कनेक्शन सोलापूरशी जोडले गेल्याने पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार पोलिसांच्या अहवालावर न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली आहे. सुनावणी नंतर सोलापूर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. २१ जानेवारी (मंगळवारी) मा. न्यायालय आपला निर्णय देतील असा अंदाज सुशीलकुमार कराड यांचे वकील अॅड. संतोष यांनी वर्तवला आहे.सुशील कराड यांचे वकील अॅड. संतोष न्हावकर यांनी माहिती देताना सांगितले की,सुरुवातीलाच माननीय न्यायालयाने एक प्रश्न उपस्थित केला होता. बीड शहरात घडलेल्या घटनेची सोलापूर कोर्टात खाजगी फिर्याद कशी काय? पीडित फिर्यादीचे वकील अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केल्यानंतर यावर सोलापूर कोर्टात सुनावणी झाली. सोलापूर कोर्टाने एमआयडीसी पोलिसांचे म्हणणे मागविले होते,त्यावर सोलापूर पोलिसांनी आपले म्हणणे सादर केले असून , मंगळवारी कोर्टाचा निर्णय समोर येईल.

हे प्रकरण नेमके काय आहे?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या नावे सान्वी ट्रेडर्स आणि त्यांच्या पत्नीच्या नावे अन्वी इंटरप्रायझेस अशा दोन फर्म आहेत. या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने १ कोटी ८ लाख रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद सुशील कराड यांनी १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फर्ममधील मॅनेजर फरार आहे. त्याच मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणातील फिर्यादी महिलेचे वकील अॅड. सूर्यवंशी यांनी यापूर्वी माहिती देताना सांगितले, सुशील कराड यांनी पीडित महिलेकडून आणि तिच्या पतीकडून जबरदस्तीने गाडया, सोने आणि प्लॉट जागा खरेदीखतान्वये लिहून घेतले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज एमआयडीसी पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केला होता. या सर्व बाबी नमूद करत अॅड. विनोद सूर्यवंशी यांचे मार्फत पीडित महिलेने सोलापूर कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली होती.

सुशील कराड यांच्या वकिलांनी दिलेली माहिती –
घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्याने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली. त्याचा तपास परळी, बीड पोलिसांनी केला. त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या तकारीत तथ्य नसल्याचे आणि तिने अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली होती. त्यावर सुनावणी झाली असून २१ जानेवारी, मंगळवारी सोलापूर कोर्ट निर्णय देतील, अशी माहिती ॲड. संतोष न्हावकर यांनी दिली आहे. यात आरोपीतर्फे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. राहुल रूपनर, ॲड. शैलेश पोटफोडे तर फिर्यादीतर्फे ॲड. विनोद सूर्यवंशी, अॅड. श्रीकांत पवार, ॲड. मधुकर व्हनमाने काम पाहात आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #SolapurCourt#sushilKarad#valmikkarad
Previous Post

‘महाकुंभ’ मेळ्यातील ‘मोनालिसा’ ला थेट चित्रपटाची ऑफर!

Next Post

गुलेन बॅरी सिंड्रोम कितपत चिंताजनक?

Next Post
गुलेन बॅरी सिंड्रोम कितपत चिंताजनक?

गुलेन बॅरी सिंड्रोम कितपत चिंताजनक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.