DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

काल रात्री वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल!

आज अचानक जामीन अर्ज मागे घेण्याचे कारण काय?

DD News Marathi by DD News Marathi
January 23, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
काल रात्री वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल!

बीड प्रतिनिधी :
दि. २३ जानेवारी २०२५

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि वाल्मिक कराडांच्या खंडणीचा संबंध असल्याप्रकरणी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे . वाल्मीक कराडच्या खंडणी प्रकरणात केलेल्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार होती .मात्र जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे ही सुनावणी होऊ शकलेली नाही .दरम्यान काल रात्री (22 जानेवारी) वाल्मीक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .आज अचानक जामीन अर्ज ही मागे घेण्यात आला . या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेकडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .

दरम्यान वाल्मीक कराड याला काल रात्री (22 जानेवारी) पोटात दुखत असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं .सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये वाल्मीक कराडवर उपचार सुरू आहेत . वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली. मधुमेह तसेच रक्तदाबाची तपासणीही बुधवारी रात्री (22 जानेवारी) करण्यात आली होती . पावणे बाराच्या सुमारास वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता बीडच्या शासकीय रुगणालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मकोका अंतर्गत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने किमान 180 दिवस वाल्मिक कराडला जामीन मिळू शकत नाही .

7 दिवसांची कोठडी संपल्यामुळे काल (22 जानेवारी)वाल्मिक कराडला बीडच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते . यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत वाल्मिक कराडला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. खंडणी प्रकरणातील गुन्हे लागलेल्या वाल्मीक कराडने खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज आज मागे घेतलाय. या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणे कडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेले होते. पण मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही . त्यामुळे आता पुढचे 6 महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे .संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात CID ला ज्या ज्यावेळी तपासासाठी वाल्मिक कराडची गरज भासेल,त्यावेळी कोर्टाच्या परवानगीने वाल्मिक कराडची चौकशी सीआयडी करू शकते .

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#dhananjaymunde#massajog#santoshDeshmukh#WalmikKarad#WalmikKaradarrested
Previous Post

२ बेड भरुन नोटा सापडल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी!

Next Post

अजितदादा म्हणाले, बायकोने पण एवढे किस कधी घेतले नाहीत!

Next Post
अजितदादा म्हणाले, बायकोने पण एवढे किस कधी घेतले नाहीत!

अजितदादा म्हणाले, बायकोने पण एवढे किस कधी घेतले नाहीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.