DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजित पवार व्यासपीठावर आणि सुप्रिया सुळे प्रेक्षकांत!

असं नेमकं का घडलं?

DD News Marathi by DD News Marathi
January 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अजित पवार व्यासपीठावर आणि सुप्रिया सुळे प्रेक्षकांत!

पुणे प्रतिनिधी :
दि. २५ जानेवारी २०२५

पुण्याच्या इंदापुरातील सरकारी कार्यक्रमात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री आणि स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे व्यासपीठावर विराजमान झाले. सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल सुळेंनी नाराजी व्यक्त केली.

इंदापुरात अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हजर होते. इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

स्थानिक खासदार असूनही सुप्रिया सुळे यांचं नाव इंदापुरातील कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं. सरकारी शिष्टाचार पाळला जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम सुरु होण्याआधी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधला. तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्याशीही संवाद साधला. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ, बहिणींमधील दुरावा यावेळीही पाहायला मिळाला. दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं.

बारामतीसह राज्यभरातील अनेक सरकारी कार्यक्रमांना विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना बोलावलं जात नाही, कार्यक्रम पत्रिकेवर त्यांची नावं नसतात, असा आक्षेप खासदार सुप्रिया सुळेंनी अनेकदा नोंदवला आहे. इंदापुरातील कार्यक्रमातही तसाच प्रकार पाहायला मिळाला. स्थानिक खासदार असूनही सुळे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं. व्यासपीठावर त्यांच्यासाठी आसन व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं. त्यांचा सत्कारदेखील खालीच करण्यात आला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#Baramati#DattatrayBharne#HarshawardhanPatil#Indapur#SupriyaSule
Previous Post

लॉर्ड शार्दूलने दुसऱ्यांदा मुंबईला वाचवले!

Next Post

पुण्यातील बेरोजगारीचे भयाण वास्तव!

Next Post
पुण्यातील बेरोजगारीचे भयाण वास्तव!

पुण्यातील बेरोजगारीचे भयाण वास्तव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.