DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!

मध्यरात्री १ वाजता प्रयागराजमध्ये दुर्दैवी घटना.

DD News Marathi by DD News Marathi
January 29, 2025
in ताज्या बातम्या
0
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!

प्रयागराज प्रतिनिधी :
दि. २९ जानेवारी २०२५

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. यादरम्यान मध्यरात्री १ वाजता (२९ जानेवारी) रोजी संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ५० ते ८० भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान होणार नाही असा निर्णय घेतला आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, आज प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, आखाड्याने मौनी अमावस्येला अमृत स्नानाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. आखाड्याने छावण्यांमधील त्यांच्या मिरवणुकाही मागे घेतल्या आहेत. आज खूप मोठा सण होता, हा योग 140 वर्षांनंतर आला होता, असंही रवींद्र पुरी म्हणाले.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #mahakumbh2025#Prayagraj#Stampede
Previous Post

इस्रोने आज घेतली शतकी झेप!

Next Post

चीनचा AI च्या जगात हलकल्लोळ! DeepSeek आहे तरी काय?

Next Post
चीनचा AI च्या जगात हलकल्लोळ! DeepSeek आहे तरी काय?

चीनचा AI च्या जगात हलकल्लोळ! DeepSeek आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.