DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

अमृता रावला केले पराभूत.

DD News Marathi by DD News Marathi
January 29, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी!

 

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २९ जानेवारी २०२५

महिला कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिला ‘महाराष्ट्र केसरी’चा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिला धोबीपछाड देत तिने पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. भाग्यश्री फंड हिला मानाची गदा आणि महाराष्ट्र केसरी किताब मिळाला आहे.

पुण्याची भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली. कोल्हापूरची अमृता पुजारी आणि पुण्याची भाग्यश्री फंड यांच्यात अंतिम सामना झाला.देवळीच्या रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. हा सामना भाग्यश्रीने 2-4 ने जिंकला. महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब 2024 -2025 मिळाला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली होती. ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने सुरु होती. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. भाग्यश्री फंडने या विजयानंतर आई वडील आणि प्रशिक्षकांचे आभार मानले.

स्पर्धा जिंकल्यानंतर भाग्यश्री फंडने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘या विजयासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते. या विजयात मला आई वडील आणि पतीने साथ दिली. माझ्या कुटुंबाच्या सहकार्याशिवाय इथपर्यंत पोहोचणं कठीण होतं. कारण कुस्तीपटूंचे कष्ट त्यांना माहिती आहेत. हरणाऱ्यानेही या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली असते. त्यांनी पुढच्या वेळेस प्रयत्न करावा.’ असं भाग्यश्री फंड हिने सामन्यानंतर सांगितलं.

‘महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन अतिशय सुंदर केलं होतं. असं आयोजन दरवर्षी करावं. या स्पर्धा जशा वाढतील तसा मुलींचा सहभागही वाढेल.’ असं भाग्यश्री फंड हिने सांगितलं. इतकंच काय सरकारने खेळाडूंना जितकी शक्य होईल तितकी आर्थिक मदत करावी, कारण प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगली नसते, असंही भाग्यश्री फंड हिने पुढे सांगितलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmrutaRao#BhagyashreeFand#MaharashtraKesariWomen
Previous Post

चीनचा AI च्या जगात हलकल्लोळ! DeepSeek आहे तरी काय?

Next Post

लग्न हा अवाढव्य खर्च करण्याचा सोहळा नसून तो एक ‘संस्कार’ आहे!

Next Post
लग्न हा अवाढव्य खर्च करण्याचा सोहळा नसून तो एक ‘संस्कार’ आहे!

लग्न हा अवाढव्य खर्च करण्याचा सोहळा नसून तो एक 'संस्कार' आहे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.