DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रतिभावंत लेखक, उत्कृष्ट क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन!

क्रिकेटचे अद्भुत वर्णन करणारा प्रतिभावंत हरपला.

DD News Marathi by DD News Marathi
February 6, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
प्रतिभावंत लेखक, उत्कृष्ट क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. ०६ फेब्रुवारी २०२५

क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते लवकरच या आजारातून कमबॅक करत घरी परततील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र त्यांची प्राणज्योत मावळली. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

द्वारकानाथ संझरगिरी यांच्या निधनाचं वृत्त समजताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेटचे मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भोगले यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे गेल्या अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मात्र आपल्या मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगले यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्याबाबतच्या आठवणी या जगासमोर मांडल्या आहेत.

द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली होती. ‘क्रिकेट कॉकटेल’, ‘क्रिकेटर्स मनातले’, ‘अश्रू आणि षटकार’, ‘अफलातून अवलिये’, ‘फिल्मी कट्टा’ या आणि अशा अनेक पुस्तकांचं लेखन द्वारकानाथ संझगिरी यांनी केलं होतं. संझगिरी फेसबूकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर विस्तृत आणि माहितीपूर्ण लिहायचे. त्यांच्या या लेखांचा एक वाचक आणि चाहतावर्ग होता. मात्र आता त्यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि सिनेचाहत्यांना या अशा माहितीपूर्ण लेखांना मुकावं लागणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 7 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #cricket#DwarakanathSanzgiri#DwarkanathSanzgiriDeath#HarshaBhogle
Previous Post

लग्न हा अवाढव्य खर्च करण्याचा सोहळा नसून तो एक ‘संस्कार’ आहे!

Next Post

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा मोठा धक्का, घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी!

Next Post
धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा मोठा धक्का, घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी!

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा मोठा धक्का, घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.