DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अखेर महाराष्ट्र शासन जागे झालेः तब्बल ४४२ नव्या रुग्णवाहिका केल्या खरेदी

खाजगी रुग्णवाहिकांनी मांडला होता बाजार: सरकारने घेतला निर्णय

DD News Marathi by DD News Marathi
May 29, 2021
in महाराष्ट्र
0
अखेर महाराष्ट्र शासन जागे झालेः तब्बल ४४२ नव्या रुग्णवाहिका केल्या खरेदी

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि.२९ मे २०२१

पुणे दि.28 :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य सेवा (उपसंचालक) डॉ. मिलींद मोरे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे (उपसंचालक) डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ४४२ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून ४४२ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post

विश्वास बसणार नाही, महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याची पत्नी होती सुप्रसिद्ध अभिनेत्री

Next Post
विश्वास बसणार नाही, महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याची पत्नी होती सुप्रसिद्ध अभिनेत्री

विश्वास बसणार नाही, महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याची पत्नी होती सुप्रसिद्ध अभिनेत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.