DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुख्याध्यापक आणि शिक्षकामध्ये जोरदार हाणामारी!

एकमेकांवर बसून केली यथेच्छ तुडवा तुडवी.

DD News Marathi by DD News Marathi
February 11, 2025
in ताज्या बातम्या
0
मुख्याध्यापक आणि शिक्षकामध्ये जोरदार हाणामारी!

भरूच प्रतिनिधी :
दि. ११ फेब्रुवारी २०२५

शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात भांडणं करू नका, दोघांमध्ये मतभेद असतील तर ते चर्चा करून सोडवा. अर्थात ही गोष्ट १०० टक्के खरी आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबाबत समस्या असेल तर शांतपणे बसून त्याच्यासोबत चर्चा करा. तुमचे गैरसमज दूर होतील. पण मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणारे शिक्षकच हाणामारी करू लागले तर काय म्हणायचं?

होय, असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. या संदर्भातील एका व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक एका शिक्षकाची यथेच्छ धुलाई करताना दिसत आहेत. या मुख्याध्यापकानं १८ सेकंदात जवळपास २५ थोबाडीत लगावल्या. पण शिक्षक देखील तयारीचा मल्ल निघाला. त्यानं सुद्धा मुख्याध्यापकांना जशास तसं उत्तर दिलं.

ही घटना गुजरातमधील भरूच या ठिकाणी घडली आहे. नवयुग शाळेतील दोन शिक्षक आपापसातच भिडले. मीडिया रिपोर्टनुसार मुख्याध्यापक हितेंद्र ठाकोर यांना शिक्षक राजेंद्र परमेर याची शिकवण्याची पद्धत आवडत नव्हती. राजेंद्र हे विज्ञान आणि गणिताचे शिक्षक आहेत. शिकवण्याच्या पद्धतीवर सवाल केल्यामुळे शिक्षकाचा इगो हर्ट झाला परिणामी मुख्याध्यापकांसोबत त्याचा जोरदार वाद झाला आणि पुढे पाहता पाहता या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

दोघांनीही एकमेकांवर हात उचलला. दरम्यान मुख्याध्यापक शिक्षकावर भारी पडले अन् त्यांनी केवळ १८ सेकंदात २५ थोबाडीत लगावल्या. त्यानंतर शिक्षकानं पाय ओढून मुख्याध्यापकांना खाली पाडलं आणि प्रतिहल्ला करण्यास सुरूवात केली. खरं तर ही लढाई आणखी घनघोर झाली असती पण तेवढ्यात इतर शिक्षक मध्ये पडले आणि त्यांनी दोघांना दूर नेऊन हाणामारी रोखली.

संपूर्ण हाणामारी मुख्यध्यापकांच्या ऑफिसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या दोन्ही शिक्षकांची बदली करावी अशी मागणी केली जात आहे. शिक्षकच असे वागत असतील तर मुलांवर काय संस्कार होणार? असा सवाल हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील नेटकरी करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bharuch#Gujrat#NavyugSchool#TeachersFighting
Previous Post

राहुल सोलापूरकरचे तोंड फोडणार्‍यास १ लाखाचे बक्षीस!

Next Post

‘आमीन’? नाही, त्याच्या जागी’जय भवानी’…!

Next Post
‘आमीन’? नाही, त्याच्या जागी’जय भवानी’…!

'आमीन'? नाही, त्याच्या जागी'जय भवानी'...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.