DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दोन तासात १७ चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग! नागपुरात संताप!

शाळेजवळ दुकानाच्या शटर दुरुस्तीला आलेल्याने आलेल्याने केले संतापजनक कृत्य.

DD News Marathi by DD News Marathi
February 13, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
दोन तासात १७ चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग! नागपुरात संताप!

नागपूर प्रतिनिधी :
दि. १३ फेब्रुवारी २०२५

नागपुरातील एका शाळेजवळीत स्टेशनरीच्या दुकानात दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या नराधमाने दोन तासात १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील सुमारे १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात ही खाजगी नामांकित शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी एक चिमुरडी शाळकरी मुलगी स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला. ३६ वर्षीय रवी लाखे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रवी हा शटर दुरुस्ती करण्याचे काम करतो. स्टेशनरी दुकानात लावलेले शटर खराब झाल्याने रवी दुकानात आला होता, असे सांगितले जात आहे.

अवघ्या २ तासात आरोपी रवी याने एक-दोन नव्हे तर स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे १७ चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करून विनयभंग केला. मात्र, भीती आणि अज्ञानामुळे आरोपीचे हे घृणास्पद कृत्य त्या चिमुरड्यांना समजू शकले नाही, त्यामुळे त्यांनी प्रतिकार देखील केला नाही. शाळा सुटल्यानंतर काही मुलींनी घरी जाऊन घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी प्रथम शाळा गाठली आणि शाळा प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मात्र, सुरुवातीला कुटुंबातील काही सदस्यच तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. आरोपी रवी विरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच इतर लहान मुलांनीही हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

आत्तापर्यंत आरोपीने १७ लहान मुलींसोबत हा जघन्य गुन्हा केला होता. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Molestation#molestationinschool#Nagpur#teenagergirlstudents
Previous Post

बापरे! ‘छावा’साठी विकी कौशलने घेतलं एवढं मानधन!

Next Post

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारे यांचं एका वाक्यात उत्तर!

Next Post
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारे यांचं एका वाक्यात उत्तर!

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारे यांचं एका वाक्यात उत्तर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.