DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

माऊंटन बायकिंगमध्ये अहिल्यानगरच्या प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्यपदक!

महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली.

DD News Marathi by DD News Marathi
February 13, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
माऊंटन बायकिंगमध्ये अहिल्यानगरच्या प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्यपदक!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. १३ फेब्रुवारी २०२५

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडने कांस्यपदक संपादन केले.
निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्‍यातील खडकाळ मार्गावरील सात फेर्‍यांची शर्यत प्रणिता सोमणने एक तास 22 मिनिटे 10.818 सेकंदात पूर्ण केली. तिची सहकारी व नाशिकची खेळाडू ऋतिका गायकवाड हिने कांस्यपदक जिंकताना हेच अंतर एक तास 27 मिनिटे 5.623 सेकंदात पार केले.

अहिल्यानगरची सुकन्या आणि आंतरराष्ट्रीय सायकल पटू प्रणिता सोमण हिने उतराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटाकवून महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच माउंटन बाईकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रणिता हिने क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. टाईम ट्रायल मधील अव्वल यशामुळे आज तिने अतिशय आत्मविश्वासाने ही शर्यत जिंकली. टाईम ट्रायल शर्यतीप्रमाणे आजही तिला कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिचे आव्हान होते. मात्र, प्रणिता हिने तिला कसे मागे ठेवायचे याचे योग्य नियोजन करून सलग दुसर्‍या सुवर्णयशाला गवसणी घातली.

“टाईम ट्रायलमध्ये काल सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. आज त्याचा फायदा घेत अन्य स्पर्धकांवर मात करून माझी सहकारी ऋतिका हिला कांस्यपदक मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. असे प्रणिता हिने सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळवण्याचे माझे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूपच समाधान झाले आहे. त्यातही प्रणिता या माझ्या सहकारी खेळाडू बरोबर पदकाच्या व्यासपीठावर उभे राहण्याची संधी मिळाली याचा आनंद मोठा आहे” असे ऋतिकाने सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #bronzemedal#Cycling#goldmedal#MountBiking#PranitaSoman#RutikaGaikwad
Previous Post

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारे यांचं एका वाक्यात उत्तर!

Next Post

माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन!अपघाती निधन!

Next Post
माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन!अपघाती निधन!

माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन!अपघाती निधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.