DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन!अपघाती निधन!

अजितदादांना मोठा धक्का, राजकीय वर्तुळात शोक.

DD News Marathi by DD News Marathi
February 14, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन!अपघाती निधन!

अकोला प्रतिनिधी :
दि. १३ फेब्रुवारी २०२५

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तुकाराम बिरकड यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मालवाहू टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करीत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करीत होते. तेव्हा या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे ८०० कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिडकर हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर मोटारसायकलवर परत येताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने मोटरसायकलला जबर धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा सुद्धा मृत्यू झाला.

दोन दिवसांनी सहपरिवार महाकुंभ मेळ्यात जाणार होते. मात्र, नियतीने आधीच आपला डाव साधला आणि काळाने बिरकड यांच्यावर घाला घातला. अपघाताची वार्ता कळताच परिवाराने आक्रोश केला. तुकाराम बिरकड यांच्या पत्नी, भाऊ प्रकाश बिरकड, शत्रूघन बिरकड यांना अश्रू अनावर झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमींना रुग्णालयात दाखल केले व अपघातातील वाहन जप्त करून, वाहन चालकासह त्याच्या साथीदारांना ताबडतोब ताब्यात घेतले.

तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच अकोल्यातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली. बिरकड यांना ज्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते, त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावत सांत्वनपर भेट दिली. यावेळी भाजप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या आमदारांसह असंख्या कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#NCP#TukaramBidkar
Previous Post

माऊंटन बायकिंगमध्ये अहिल्यानगरच्या प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्यपदक!

Next Post

पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू!

Next Post
पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू!

पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.