DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने ‘छावा’ चित्रपट पाहावा!

शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया.

DD News Marathi by DD News Marathi
February 15, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने ‘छावा’ चित्रपट पाहावा!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ फेब्रुवारी २०२५

विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा काल १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. त्याचबरोबर अनेक कलाकार, प्रेक्षक सिनेमा बघून झाल्यानंतर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ‘छावा’ सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे.

शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, ‘नमस्कार! मी आताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत, लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा पाहिला. खूपच सुंदर सिनेमा बनवलाय. प्रत्येक हिंदुस्थानीने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा सिनेमा जरुर बघावा.’

‘आपलं रक्त सळसळतं. डोळ्यातून पाणी थांबत नाही. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजांनी एवढे कष्ट सोसले. त्या नालायक औरंगजेबाने क्रुरतेच्या सीमा पार केल्या. लक्ष्मण उतेकर साहेबांनी या सिनेमाला खूप सुंदर पद्धतीने चित्रित केलं आहे. मानलं पाहिजे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. सिनेमातील सर्व मराठी कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. अनेक वर्षांनी एक उत्कृष्ट ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळाला.’ असं शरद पोंक्षे यांनी पुढे म्हटलं आहे.

शरद पुढे म्हणतात की, ‘या सिनेमाचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच. ए. आर. रहमान यांचं बॅकग्राऊंड म्युझिक खूपच सुंदर. औरंगजेब शेवटी आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या क्रुरपणे हत्या करतो ते पाहावत नाही. जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशव्यांसारखे महानायक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले…आणि सध्याची तरुण पिढी? शिकायला पाहिजे आपण. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने, प्रत्येक हिंदुस्थानीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा सिनेमा आवर्जून पाहावा. मी हात जोडून विनंती करतो की, आताच तिकीट काढा आणि छावा बघा.’

दरम्यान, ‘छावा’ या सिनेमामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. विकी कौशल आणि रश्मिका यांच्या या भूमिकांचं कौतुकही केलं जातंय.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #chhava#chhtrapatisambhajimaharaj#sharadponkshevickykaushal
Previous Post

कोकणात ठाकरेंचे बुरुज एकापाठोपाठ ढासळू लागले!

Next Post

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच गळती लागलीये, त्यात हकालपट्टी करावी लागते आहे!

Next Post
शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच गळती लागलीये, त्यात हकालपट्टी करावी लागते आहे!

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच गळती लागलीये, त्यात हकालपट्टी करावी लागते आहे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.