DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नीलम ताई, मी लवकरच भांडाफोड करणार. माझ्याकडे तुमची पूर्ण कुंडली!

ठाकरे गटाचे नेते अशोक हरणावळ यांचा इशारा.

DD News Marathi by DD News Marathi
February 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नीलम ताई, मी लवकरच भांडाफोड करणार. माझ्याकडे तुमची पूर्ण कुंडली!

पुणे प्रतिनिधी :
दि. २४ फेब्रुवारी २०२५

दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. या संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल केलं. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं.

त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थाना बाहेर काल ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आणि नीलम गोऱ्हे यांनी नाक घासून उद्धव ठाकरे यांची माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.नीलम गोऱ्हे चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईचं विधान परिषदेचं कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर पुण्याचे गटनेते अशोक हरणावळ होते त्यांची मुलाखत घ्या,मग मर्सिडिज प्रकरण कळेल,असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

त्या गौप्यस्फोटाबाबत पुणे महापालिकेतील ठाकरे गटाचे माजी गटनेते अशोक हरणावळ यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राज्यभरात लाखो शिवसैनिक घडले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.यापैकी मी एक असून उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवक,गटनेता होण्याची संधी दिली.पण ज्यावेळी नीलम गोऱ्हे या पुणे जिल्ह्याच्या संपर्क नेत्या होत्या, त्यावेळी नीलम गोऱ्हे या महापालिकेच्या प्रत्येक कामकाजात हस्तक्षेप करीत असत. कोणाच्या विरोधात सभागृहात प्रश्न विचारायचा,कोणाला अडचणीमध्ये आणायाचे,त्यावेळी अर्थकारण कसे करण्यात आले, हे मला माहिती आहे. त्यामुळे आमचे श्रध्दास्थान उद्धव ठाकरे यांच्यावर नीलम गोऱ्हे यांनी आरोप करणे थांबवावे, अन्यथा नीलम ताई माझ्याकडे तुमची पूर्ण कुंडली असून लवकरच भांडाफोड केला जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AshokHarnawal#neelamgorhe#shivasenaubt#UddhavThackeray
Previous Post

किंग कोहलीच्या ‘त्या’ कृतीवर पाकीस्तानीसुद्धा फिदा!

Next Post

भारत-पाक सामन्यावेळी भारतविरोधी घोषणा!

Next Post
भारत-पाक सामन्यावेळी भारतविरोधी घोषणा!

भारत-पाक सामन्यावेळी भारतविरोधी घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.