DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भारत-पाक सामन्यावेळी भारतविरोधी घोषणा!

निलेश राणेंकडून करेक्ट कार्यक्रम, पोलिसांच्या बेड्या.

DD News Marathi by DD News Marathi
February 25, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
भारत-पाक सामन्यावेळी भारतविरोधी घोषणा!

Cricket - ICC Men's Champions Trophy - Group A - India v Pakistan - Dubai International Stadium, Dubai, United Arab Emirates - February 23, 2025 India's Virat Kohli celebrates after hitting four runs to reach his century and win the match REUTERS/Satish Kumar

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :
दि. २५ फेब्रुवारी २०२५

भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी ची मॅच भारताने जिंकल्यावर सगळीकडे जल्लोष साजरा होत असतानाच मारून मध्ये एक राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक केली आहे. शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांनीही राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली आहे.

वराडकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंगणेवाडी यात्रेतून काल रात्री माघारी परतल्यानंतर शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना रात्रौ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान त्यातील एक मुलगा हा भारत देशाच्या विरोधात घोषणा देत होता. त्याला याबाबत विचारणा केली असता तो पळून गेला. त्यानंतर तो मुलगा हनुमान मंदिर येथे दिसला. त्याला पुन्हा विचारले असता त्याने आपल्या वडिलांना भेटा असे सांगितले. त्याच्या वडिलांची भेट घेत माहिती दिली असता, त्यांनीही देशाच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली.

याची माहिती वराडकर याने मित्र हरेश पडते याला दिल्यानंतर घटनास्थळी भाऊ सामंत, संतोष लुडबे, विजय केनवडेकर, अवि सामंत, आप्पा लुडबे, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर यांच्यासह हिंदू बांधव जमा झाले. सर्वांनी त्या भंगार व्यवसायिकांना देशाच्या विरोधात घोषणा देणे योग्य नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

आडवण येथील भंगार व्यावसायिक किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान या दोघांना अटक करून मालवण पोलिसांनी न्यायालयात हजर केले. मात्र त्यांचे वकीलपत्र कोणीही घेतले नसल्याने दोघाही संशयित आरोपींना सावंतवाडी कारागृहात नेण्यात आले. आज मंगळवारी पुन्हा त्या दोघांना मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ICCchampionstrophy2025#nileshrane#sindhudurg
Previous Post

नीलम ताई, मी लवकरच भांडाफोड करणार. माझ्याकडे तुमची पूर्ण कुंडली!

Next Post

धुळ्यातील कॉलेज तरुणांचा गुंगीच्या औषधांचा कारनामा उघडकीस! 

Next Post
धुळ्यातील कॉलेज तरुणांचा गुंगीच्या औषधांचा कारनामा उघडकीस! 

धुळ्यातील कॉलेज तरुणांचा गुंगीच्या औषधांचा कारनामा उघडकीस! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.