DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडे सापडला!

या प्रकरणी रूपाली चाकणकर आक्रमक.

DD News Marathi by DD News Marathi
February 28, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडे सापडला!

पुणे प्रतिनिधी :
दि. २८ फेब्रुवारी २०२५

स्वारगेट बस स्थानकामध्ये २६ वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावर आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात यश आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गाडेला पोलिसांनी अटक केलीय. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा देण्यापर्यंत पाठपुरवठा करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं आहे.

ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी संबंधित पीडितेने स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करून सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. पीडितेने आरोपीचे वर्णन केलं त्यावरून तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांची ८ पथके सुरूवातीला रवाना झाली होती, मात्र दोन दिवस झाल्यावरही आरोपीचा तपास न लागल्याने १३ पथके पाठवली गेली. अखेरीस रात्री दीडच्या दरम्यान पोलिसांनी गुनाट गावामधून त्याला अटक केली. “सुरूवातीपासून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो” असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

“आरोपीने ज्या पद्धतीने अत्याचार केला त्याची तीव्रता पाहता ही अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक घटना आहे. यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा आम्ही करू. पण अशा घटना घडू नयेत यासाठी आगार सुरक्षा, मदतकक्ष आणि पोलीस पेट्रोलिंग याची माहिती घेण्यासाठी स्वत: कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत. आम्ही तीन वर्षे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनसुनावणीला जात असताना परिवहन विभागाचा आढावा घेत असतो. छत्रपती संभाजीनगरला जात असताना पैठणमधील परिवहनचे कलेक्टर ऑफिसमधून व्हिडीओद्वारे पाहणी केली होती. काही त्रुटी राहत असतील तर त्या आम्ही भरून काढू, महिला आणि युवतींचा प्रवास सुरक्षिततेचा व्हावा याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ,” असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये २६ वर्षीय महिलेवर शिवशाही बसमध्ये आरोपी दत्ता गाडे याने बलात्कार केला होता. आरोपी फरार झाल्यावर पोलिस त्याच्या शोधात होते. आपल्या गावामध्येच गाडे लपून बसला होता. शिवारात मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayGade#Gunat#RupaliChakankar#SwargateRapeCase
Previous Post

पाकिस्तानी खेळाडूंची इज्जत सगळीकडेच चव्हाट्यावर!

Next Post

नराधम गाडेकडून तीनदा आत्महत्त्येचा प्रयत्न!

Next Post
नराधम गाडेकडून तीनदा आत्महत्त्येचा प्रयत्न!

नराधम गाडेकडून तीनदा आत्महत्त्येचा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.