DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बीसीसीआयचं मेडल विराटला नाही, तर या खेळाडूला!

कोणाला मिळालं हे मेडल?

DD News Marathi by DD News Marathi
March 5, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
बीसीसीआयचं मेडल विराटला नाही, तर या खेळाडूला!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०५ मार्च २०२५

विराट कोहीलीने धडाकेबाज फलंदाजी करत ८४ धावा केल्या आणि सामनावीर पुरस्कारही मिळवला. पण त्यानंतरही बीसीसीआयचे मेडल विराट कोहलीला मिळू शकले नाही. हे मेडल देण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आमंत्रित करण्यात आले होते. रवी शास्त्री यांनी यावेळी कोणाला मेडल दिले, याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीने पाकिस्तानच्या सामन्यासारखी फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातही केली. पण विराटने पाकिस्तानच्या सामन्यात शतक झळकावले होते, पण ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात मात्र त्याला शतकाने हुलकावणी दिली. पण विराट कोहलीनेच भारताच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला होता आणि संघाला फायनलमध्ये प्रवेश करुन दिला. पण बीसीसीआयच्या मनात मात्र वेगळचं असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

रवी शास्त्री हे ड्रेसिंग रुममध्ये आले आणि वातावरण उत्साही झाले. कारण रवी शास्त्री यांना ड्रेसिंग रुममध्ये आल्यावर लगेच भारतीय खेळाडूंना आपल्या शब्दलालित्याने चार्ज केले. रवी यांनी रोहित शर्माची भेट घेतली, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनाही मिठी मारली. त्यानंतर रवी शास्त्री यांनी भारताची कामगिरी कशी सुरु आहे, यावर आपली टिप्पणी केली आणि त्यानंतर बीसीसीआयचे हे मेडल कोणाला मिळणार, याची घोषणा करायला सुरुवात केली. ही घोषणा करताना रवी शास्त्री यांनी बरेच बारकावे सांगितले. त्यानंतर रवी शास्त्री यांनी श्रेयस अय्यरला हे बीसीसीआयचं मेडल दिलं. श्रेयस अय्यरला हे मेडल का मिळालं, याचंही कारण यावेळी सांगण्यात आलं.

ऑस्ट्रेलिया यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरी हा दमदार फलंदाजी करत होता. पण कॅरीला यावेळी श्रेयस अय्यरने डायरेक्ट थ्रो करत रन आऊट केले. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर लगाम लावता आला. त्यामुळे यावेळी बीसीसीआयने हे मेडल श्रेयस अय्यरला दिल्याचे समोर आले आहे.

श्रेयस अय्यरने त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. भारताचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर श्रेयसने विराटच्या साथीने भारतीय संघाला चांगली भागीदारी मिळवून दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ICCchampionstrophy2025#RaviShastri#ShreyasAyyar#ViratKohli
Previous Post

पाच वर्षांत बीड जिल्ह्यात २७६ हत्या!

Next Post

मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप!

Next Post
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप!

मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.