DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बैठका घेऊन ठरवतात राजीनामा घ्यायचा की नाही!

खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी..दमानियांचा रोष.

DD News Marathi by DD News Marathi
March 6, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
बैठका घेऊन ठरवतात राजीनामा घ्यायचा की नाही!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ मार्च २०२५

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी मस्साजोगचे सरपंच सतोंष देशमुख हत्येचे अत्यंत भयावह फोटो व्हायरल झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर हा राजीनामा देण्यात आला आहे. नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितल जात आहे. या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, राजीनामा का घेतला त्यांना उचलून बाहेर का फेकलं गेलं नाही. त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होते. त्यांचा राजीनामा घेऊन आपण काय करतो आहे? मुख्यमंत्र्यांनी त्यांना उचलून राजकारणातून बाहेर फेकायला हवं होत.

दमानिया पुढे म्हणाल्या, मला ऐवढा राग येत आहे की सामान्य लोकांना वाल्मिक कराडसारखी माणसं चिरडून जातात. त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देणार असे राजकारणी. हे सुद्धा त्यांच्यात गुंतलेले आहेत. कारण सगळे पैसे या राजकारण्यांना पुरवले जात होते. यांचा राजीनामा घेण्यासाठी बैठका होतात. यांना उचलून फेकून का दिलं जात नाही.

मुख्यमंत्र्यांना हे व्हिडिओ फोटो माहित नव्हते असं नाही. मला किती जणांचे मेसेज आले. आम्हाला रात्री झोप लागली नाही डोळे बंद झाले की ते फोटो दिसायचे. ज्या माणसाला संवेदना आहे, प्रेम, आपूलकी आहे त्या प्रत्येक माणसाला असं वाटतं.पण आपल्या राजकारण्यांना भावना उरल्या नाहीत. ते बैठका घेतात मग ठरवतात की आपण राजीनामा घ्यायचा की नाही. अजित पवार म्हणतात पुरावे द्या. पुरावे मिळाल्यानंतर आम्ही राजीनामा घेऊ. काय हे कुठल्या स्तरावर आले आहे हे राजकारण. धनंजय मुंडे स्वत:ला समजतात काय? हकालपट्टी करायला पाहिजे होती. मी याचा शोध पुढे सुरू ठेवणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार सोमवारी देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनिल तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी राजीनामा देण्याचा निर्णय झाला होता. ९ डिसेंबर रोजी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हा अनेक दिवस फरार होता. गेल्या महिन्यात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती.कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक होता. मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AnjaliDamania#DevendraFadnavis#dhananjaymunde#WalmikKarad
Previous Post

मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप!

Next Post

चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार! आरोपी केवळ १५ वर्षांचा!

Next Post
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार! आरोपी केवळ १५ वर्षांचा!

चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार! आरोपी केवळ १५ वर्षांचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.