DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही!

RSS चे भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने पडली ठिणगी!

DD News Marathi by DD News Marathi
March 6, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ मार्च २०२५

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी एक विधान केले. ते घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते. पण बोलताना ते असे काही बोलून गेले की, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या. भाजप सरकार आल्यापासून मुंबई तोडण्याची भाषा होत आहे, मुंबईतील मराठी माणसांवर अन्याय होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. त्यात भैय्याजींच्या वक्तव्याने फोडणी बसली आहे.

“मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले आणि वाद उफळला. विद्याविहार येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यानंतर आज त्याचे पडसाद उमटले. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. भैय्याजी यांच्याविरोधात कारवाईचा मुद्दा लावून धरला.

“मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असं वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला.

दरम्यान भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा भाव समजून घ्या असे आमदार राम कदम म्हणाले. तर जोशींचे कृत्य हे औरंगजेबापेक्षा भयंकर आहे, जोशी यांचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का? त्यांचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह असल्याचा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मुंबईची भाषा मराठीच आहे. सत्ताधाऱ्यांनी या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdityaThackeray#BhayyajiJoshi#DevendraFadnavis#ghatkopar#Girgav#RSS#SanjayRaut
Previous Post

चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार! आरोपी केवळ १५ वर्षांचा!

Next Post

कमबख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें! – योगी आदित्यनाथ.

Next Post
कमबख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें! – योगी आदित्यनाथ.

कमबख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें! - योगी आदित्यनाथ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.