DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानबाहेर!

अजय जडेजाने केले अक्रमचे तोंड बंद.

DD News Marathi by DD News Marathi
March 6, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानबाहेर!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०६ मार्च २०२५

भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पाकिस्तानचा गेम केला. कारण पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीची यजमान असला तरी स्पर्धेची फायनल मात्र त्यांच्या देशात होणार नाही. पाकिस्तानसाठी ही मोठी नामुष्कीची वेळ आहे. पण भारताच्या विजयानंतर अजय जडेजाने वसिम अक्रमची एका वाक्यातच बोलती बंद केल्याचे आता पाहायला मिळाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना संपल्यावर एक क्रिकेट शो टीव्हीवर सुरु होता. यामध्ये अजय जडेजा, वसिम अक्रम, वकार युनूस हे खेळाडू होते. त्यावेळी भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यामुळे अजय जडेजा आणि वसिम अक्रम यांच्यात जोरदार संभाषण सुरु झालं होतं. या दोघांमध्ये वादावादी होणार, असे दिसत होते. त्यावेळी वसिम अक्रमने अजय जडेजाला म्हटले की, “तुम्ही फक्त पाकिस्तानला पराभूत केले नाही, तर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही पाकिस्तानपासून हिरावून घेतली.” त्यानंतर अजय जडेजाने एका वाक्यात वसिम अक्रमची बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले.

वसिम अक्रमच्या वाक्यानंतर अजय जडेजा म्हणाला की, “भारताचा यामध्ये कसला दोष आहे? आम्ही पाकिस्तानपेक्षा चांगलं क्रिकेट खेळलो आणि त्यामुळेच ही गोष्ट शक्य होऊ शकली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल भारतामुळे हिरावली गेली, हे म्हणणे चुकीचे ठरेल.”

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानात का होणार नाही…
आयसीसीच्या स्पर्धेत जो देश यजमान असतो, त्यांच्याच देशात फायनल होतो हे आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे. पण या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हे पाकिस्तानकडे असले तरी या स्पर्धेची फायनल मात्र पाकस्तानात होणार नाही. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने दुबईमध्ये होतील, हे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ठरवण्यात आले होते. त्यामुळे आता भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानात नाही तर दुबईत होणार आहे.

भारताने फक्त ऑस्ट्रेलियाला पराभूत केले नाही तर पाकिस्तानलाही नमवले आहे. कारण आता यजमान असूनही आपल्या देशात फायनल होणार नसल्याची नामुष्की पाकिस्तानवर आली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjayJadeja#Dubai#ICCchampionstrophy2025#ICCchampionstrophy2025Final#teamindia#WaqarYunus#wasimakram
Previous Post

कमबख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें! – योगी आदित्यनाथ.

Next Post

“संतोष देशमुखांना न्याय देण्याचं सुरेश धसांचं ध्येय नव्हतं!”

Next Post
“संतोष देशमुखांना न्याय देण्याचं सुरेश धसांचं ध्येय नव्हतं!”

"संतोष देशमुखांना न्याय देण्याचं सुरेश धसांचं ध्येय नव्हतं!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.