DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

संजय राऊतांनी सांगितले रविंद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याचे कारण!

म्हणाले, "ही आहे आतली बातमी."

DD News Marathi by DD News Marathi
March 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
संजय राऊतांनी सांगितले रविंद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याचे कारण!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ मार्च २०२५

माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता गेल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला असे म्हणावे लागेल. कॉंग्रेसने रविंद्र धंगेकरांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवलं होतं. आता निवडणुका झाल्यावर त्यांनीच पक्षाला रामराम केल्याने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

रविंद्र धंगेकर खरोखर का गेले हे त्यांनी त्यांचे जे दैवत असतील त्यांना स्मरून सांगावं. विकासकामासाठी गेले की त्यांच्या कसबा मतदारसंघात गणेश पेठ येथील एक जागा आहे. जी प्रतिभा धंगेकर आणि त्यांच्या पार्टनरच्या नावावर आहे. हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न असून त्या जागेची किंमत ६० कोटी आहे असं म्हणतात. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये ही जागा वक्फ बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून भाजपचे लोकं कोर्टात गेले. ते काम अडवण्यात आलं, त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली. प्रतिभा धंगेकरांवर अटकेची तलवार निर्माण झाली, हे वातावरण धंगेकरांनी पक्ष सोडण्यासाठी करण्यात आलं. आश्चर्य म्हणजे त्यांच्या सोबतचे जे पार्टनर आहेत ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत आणि मनसेच्या माजी नगरसेवकाची पत्नीसुद्धा असल्याची माझी माहिती आहे. गुंतवणूक केल्यावरसुद्धा त्यांची कोंडी करण्यात आली. खटले दाखल करण्यात आले, पत्नीला अटक होईल अशी भीती त्यांना वाटली. या भीतीपोटी विकासकाम रखडली आहेत या सबबीखाली आमचे प्रिय रविंद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाल्याच्या दावा संजय राऊतांनी केला आहे.

अजित पवार, शिंदे गट आणि भाजपमध्ये भीतीपोटी पक्षप्रवेश सुरू आहेत. स्वत: एकनाथ शिंदे, त्यांची लोकं आणि अजित पवारांसह भाजपमध्ये गेलेल्या लोकांनीही भीतीपोटीच प्रवेश केला. एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जातेय, त्याच्यावरती काही जुनी प्रकरणे असतील त्याचा दबाव आणला जातो. पक्षांतराची ही एक सिस्टिम आहे. हा फक्त रविंद्र धंगेकरांचा विषय नाहीय, याआधी झालेली ९० टक्के पक्षांतरे याप्रकारे झाली आहेत. वायकरांवर ज्या प्रकारचा दबाव होता तोच धंगेकरांवर होता. वायकरांना याच पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं. रविंद्र वायकरांवर असे गुन्हे दाखल करण्यात आले आणि पक्षांतरानंतर त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीला धंगेकर उभे राहिले तेव्हापासून हा दबाव सुरू झाला. त्यांची बदनामी, कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. ती जागा त्यांच्या पत्नीच्या जागेवर असल्याची माझी माहिती आहे. पक्षात हे आले ते आले पण ते का आले हे शिंदे आणि अजित गटाने सांगायला हवं, असा सवाल राऊतांनी केला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #indiannationalcongress#ravindradhangekar#SanjayRaut
Previous Post

शुक्रवारी दिला काँग्रेस बळकटीचा नारा, सोमवारी केला बाय बाय!

Next Post

पुण्यातील वाल्मिक कराड म्हणजे रविंद्र धंगेकर!

Next Post
पुण्यातील वाल्मिक कराड म्हणजे रविंद्र धंगेकर!

पुण्यातील वाल्मिक कराड म्हणजे रविंद्र धंगेकर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.