DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कोरटकर अधिकच अडकत चालला!

कोल्हापूर कोर्टात सुनावणी पूर्ण झाली.

DD News Marathi by DD News Marathi
March 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
कोरटकर अधिकच अडकत चालला!

कोल्हापूर प्रतिनिधी :
दि. ११ मार्च २०२५

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने ११ मार्चपर्यंत अटकपूर्व अंतरिम जामीन दिला होता. या जामिनाची मुदत आज संपली आहे. आज दुपारी अडीच वाजता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या निकाल देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूर येथील प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अटकेपासून बचाव करण्यासाठी कोरटकरने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातून ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करुन घेतला. मात्र या जामिनाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर करताना कोल्हापूर सत्र न्यायालयात आमची बाजू ऐकून घेतली गेली नाही असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. यावेळी उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश दिले होते की न्यायालयाने राज्य सरकारची ही बाजू ऐकून निर्णय घ्यावा. त्यानुसार आज दुपारी अडीच वाजता कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. तब्बल पाऊण तास चाललेल्या सुनावणीत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या वतीने एडवोकेट असीम सरोदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर प्रशांत कोरटकर याच्या वतीने सौरभ घाग, गणेश गिलबिल, दिव्या भाटिया, सिद्धार्थ जाधव आणि सरकारी पक्षाच्या वतीने विवेक शुक्ल यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट विवेक शुक्ल यांनी बाजू मांडत असताना प्रशांत कोरटकरला पोलीस तपासासाठी कोर्टात हजर राहणे गरजेचे असून कोरटकरने पोलिसांना मोबाईल देत असताना मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट केला असल्याने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे कोरटकरचा जामीन नामंजूर करावा आणि चौकशीसाठी पोलिसांना ताब्यात घेण्यास परवानगी मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. यावेळी एडवोकेट असीम सरोदे यांनी देखील हीच मागणी लावून धरली. तर कोरटकर यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान एक दिवसासाठी अंतरिम जामिनास मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. तसंच प्रशांत कोरटकर याच्या जीवाला धोका असल्याने त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करायचं की त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी ही कोरटकरच्या वकिलांनी केली. मात्र दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर निर्णय कोर्टाने राखून ठेवला असून उद्या याबाबतचा निर्णय कोर्ट घेणार आहे.

दरम्यान सुनावणीनंतर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना, हा विषय केवळ माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल जी घाणेरडी वक्तव्य करण्यात आली त्याबद्दलच आहेत. महाराष्ट्रातील व्यक्ती अशी वक्तव्य करतो आणि लपून राहतो त्याने वक्तव्य केला नसेल तर तो लपून राहिला नसता. प्रशांत कोरटकर यांनी मोबाईल पोलिसांना दिला मात्र सर्व डेटा डिलिट करून दिला आहे. गेले आठ ते दहा दिवस झालं एका चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही, मग आपल पोलीस दल इतकं असक्षम आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. काल त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र ज्याने इतकं घाणेरडं वक्तव्य केलं त्यावर कारवाई करायला हवी. म्हातारी गेल्याचं दुःख नाही मात्र काळ सोकावता कामा नये. जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी कशा पद्धतीने कारवाई करता येते, हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माहित आहे ते त्यांनी करावं, असे इंद्रजीत सावंत म्हणाले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AseemSarode#ChhatrapatiSambhajiMaharaj#chhatrapatishivajimaharaj#IndrajitSawant#Kolhapur#PrashantKoratkar
Previous Post

पुण्यातील वाल्मिक कराड म्हणजे रविंद्र धंगेकर!

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार!

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.