DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“तुमच्या शब्दाला मान दिला, आता मला न्याय मिळावा”

या NCP नेत्याने दिली फडणवीस-अजितदादांना साद.

DD News Marathi by DD News Marathi
March 13, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“तुमच्या शब्दाला मान दिला, आता मला न्याय मिळावा”

पुणे प्रतिनिधी :
दि. १३ मार्च २०२५

येत्या २७ मार्च रोजी राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी १७ मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या पाच जागांपैकी भाजपला तीन, शिंदेंच्या शिवसेनेला एक, तर राष्ट्रवादीला एक अशा जागा मिळणार आहेत. यापैकी भाजपच्या तीन जागांचे उमेदवार फायनल झाल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीमध्ये मात्र एका जागेसाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे.

यातच आता पिंपरी – चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. नाना काटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड या भागातील नेते आहेत. ते चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तशी तयारी देखील त्यांनी केली होती. मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाटायला गेल्याने ऐन वेळेस नाना काटे यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला माघार घ्यायला लावली होती त्या बदल्यात आता न्याय करण्याची वेळ आली असून विधानपरिषदे संदर्भात आम्ही अजित पवारांना भेटणार असल्याचं नाना काटे म्हणाले आहेत. तर, महायुतीमध्ये चिंचवडची जागा ही भाजपला जात आहे त्यामुळे तुम्ही आता माघार घ्या, पुढे जे काही असेल ते आपण पाहू असं अजित पवार यांनी मला विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं. आता विधानपरिषदेसाठी निवडणूक होत आहे त्यामुळे हाच तो क्षण आहे. असं नाना काटे म्हणाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे विधानसभेवर दोन आमदार आहेत तर विधानपरिषदेवर दोन आमदार आहेत. त्यामुळे शहरात भाजपचे चार आणि राष्ट्रवादीचा फक्त एक आमदार आहे. शहरात पक्षाची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक आमदार आवश्यक आहे. त्यामुळे माझ्यासाठी शहरातील सर्व नगरसेवकांनी सह्यांची मोहीम राबवली आहे. आम्ही लेटर देखील तयार केलं आहे. परंतु आत्ता अधिवेशन सुरू असल्याने अजित दादांची भेट होत नाही. पण दादांना आम्ही निरोप दिला आहे. आम्ही सर्वजण सह्यांचे निवेदन घेऊन दादांना भेटणार आहोत. असं देखील नाना काटे म्हणाले आहेत.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता आणि विनंती केली होती की नानाभाऊ यावेळेस आमच्यासाठी माघार घ्या. भविष्यात आम्ही नक्कीच तुमच्या कामी येऊ. म्हणजेच तो दिवस, तो क्षण आत्ता आहे. त्यामुळे हे लोक पण मला मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळून काम केलं आहे. आता या काळात त्यांनी महायुतीचा धर्म कसा पाळायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. असं म्हणत नाना काटे यांनी राष्ट्रवादी सह भाजपमधून सुद्धा विधानपरिषदेच्या जागेसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एका जागेसाठी शंभरहून अधिक अर्ज आले आहेत. त्यात नाना काटेंची देखील भर पडली आहे. आता या मधून अजित पवार नक्की कोणाला संधी देतात हे लवकरच स्पष्ट होईल.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#DevendraFadnavis#PimpriChinchwad#Vidhanparishad
Previous Post

‘खोक्या’ची संपत्ती करणार जप्त?

Next Post

धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाला मारहाण प्रकरण गोत्यात आणणार!

Next Post
धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाला मारहाण प्रकरण गोत्यात आणणार!

धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाला मारहाण प्रकरण गोत्यात आणणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.