DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रार्थनांना यश! सुनीता विलियम्स सुखरूप परतल्या!

कलाकारांच्या शुभेच्छांच्या खास पोस्ट्स.

DD News Marathi by DD News Marathi
March 19, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
प्रार्थनांना यश! सुनीता विलियम्स सुखरूप परतल्या!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १९ मार्च २०२५

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि क्रू-९ टीमने अवकाशातील ९ महिन्यांच्या असाधारण मोहिमेनंतर १९ मार्च रोजी पृथ्वीवर एक अद्भुत पुनरागमन केलं. अंतराळवीर निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांचा समावेश असलेल्या क्रूने पृथ्वीभोवती ४५७७ प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ते परत आले.

त्यांच्या परत येण्याने जगभरातून उत्साह आणि कौतुकाची लाट उसळली, अनेक प्रमुख भारतीय सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर अंतराळवीरांना त्यांच्या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण प्रवासाबद्दल अभिनंदन केलंय. सुनीता विल्यम्स आणि तिच्या क्रूच्या परत येण्याचा आनंद साजरा करणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटींपैकी एक भारतीय मेगास्टार चिरंजीवी आहेत. चिरंजीवी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘पृथ्वीवर परत आल्याबद्दल आपलं स्वागत आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर !! ऐतिहासिक आणि वीर ‘घरी’ येत आहेत!!!”

आर माधवनने पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘प्रिय सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा या भूमीवर तुझं खूप स्वागत. आमच्या प्रार्थनांना आज यश आलं. तुम्हाला सुरक्षित आणि हसताना पाहून खूप छान वाटतंय. तब्बल २६० हून जास्त दिवस अंतराळात राहून सुरक्षित परत येणं.. करोडो लोकांच्या सदिच्छा आणि देवाच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालंय. तुमच्या संपूर्ण टीम आणि क्रूचे माझ्याकडून अभिनंदन.’

मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरनेही सुनीता विल्यम्सच्या परत येण्याबद्दल तिचा उत्साहाचं कौतुक केलं आहे “असे क्षण मानवतेची व्याख्या करतात! आपण आपलं संशोधन आणि तंत्रज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना, कठीण काळात आपली लवचिकता आपल्याला परिभाषित करते,” असं मानुषी छिल्लरने सोशल मीडियावर लिहिलं.

तेलुगू अभिनेता शौर्य यांनीही सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचे कौतुक केलं आणि त्यांना ‘विश्वाचे खरे योद्धे’ असं म्हटलं आहे. “सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचे पुनरागमन केवळ अंतराळ समुदायासाठीच नव्हे तर भारत आणि जगासाठी एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे” असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #NASA#Space#SunitaWilliams
Previous Post

जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत भारताने ३३ पदके जिंकली! पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन!

Next Post

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण …

Next Post
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण …

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.