DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण …

राहावं लागणार ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये !

DD News Marathi by DD News Marathi
March 19, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण …

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १९ मार्च २०२५

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर हे अखेर पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. पण असं असलं, तरी या काळात संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावं लागणार आहे!

पृथ्वीवर परतले, पण ४५ दिवस थांबावं लागले!
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे पृथ्वीवर जरी परतले असले, तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.

काय आहे हा ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’?
साधारणपणे ४५ दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’ अंतर्गत दिवसाचे दोन तास, असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण ४५ दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत. या काळामध्ये या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया यासंदर्भात सामान्य परिस्थितीत येण्यासाठी मदत केली जाईल.

या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’चे साधारणपणे तीन टप्पे असतील. सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर आधारित या प्रत्येक टप्प्यातील बाबी या दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ठरवल्या जातील.

पहिला टप्पा – या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना चालणे-फिरणे, शारिरीक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे यासंदर्भात उपचार दिले जातील. दुसर्‍या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव, त्यानुसार शारिरीक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल, शरीराची जाणीव, आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश होतो. तिसरा टप्पा हा या कार्यक्रमाचा सर्वात अधिक काळ चालणारा टप्पा असेल. या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या शारिरीक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.

सुनीता विल्यम्स यांच्यानावे ‘स्पेसवॉक’ विक्रम!
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांनी त्यांच्या २८६ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात एकूण १२ कोटी १३ लाख ४७ हजार ४९१ मैल प्रवास केला. पृथ्वीभोवती ४ हजार ५७६ फेऱ्या मारल्या. या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला ठरल्याचा विक्रम नावावर केला आहे. सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेत एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक केला आहे. एकूण सर्वाधिक काळ स्पेसवॉक केलेल्या अंतराळवीरांच्या यादीत त्या चौथ्या स्थानी आहेत.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BuchWilmor#NASA#Space#SunitaWilliams
Previous Post

प्रार्थनांना यश! सुनीता विलियम्स सुखरूप परतल्या!

Next Post

हिंजवडीत धावत्या बसला लागली आग! होरपळून चार जणांचा मृत्यू!

Next Post
हिंजवडीत धावत्या बसला लागली आग! होरपळून चार जणांचा मृत्यू!

हिंजवडीत धावत्या बसला लागली आग! होरपळून चार जणांचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.