DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले. प्रशासन ॲक्शन मोडवर!

जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती.

DD News Marathi by DD News Marathi
March 21, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले. प्रशासन ॲक्शन मोडवर!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
दि. २१ मार्च २०२५

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबर परिसरात ‘एसआरपीएफ’चे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकातील २५ पोलिस जवान, ६० पोलिस अंमलदार, महिला पोलिस, भारतीय पुरातत्त्व विभागाचे खासगी सुरक्षारक्षक असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बजरंग दल हे औरंगजेबाच्या कबरीवर आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर मोठा इशारा देखील देण्यात आलाय. आता यावर बोलताना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून काही चर्चा कानावर येत आहेत, त्यामुळे पोलीस बंदोबस्त आम्ही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. विविध प्रतिबंधात्मक आदेश आम्ही जिल्हाभरामध्ये लागू केलेले आहेत, शहरात देखील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आहे. काहींनी या ठिकाणी जाऊन निदर्शने आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याच दृष्टिकोनातून देखील आम्ही पावले उचलली आहेत.

पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासंदर्भात देखील सूचना दिल्या असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना दिलीप स्वामी म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. खुलताबाद येथे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, याकरिता प्रशासनाकडून अगोदरच पाऊले उचलली जात आहेत.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले की, बाहेरच्या जिल्ह्यातील काही मंडळी होती. काल आम्ही मिस्टर एकबोटे म्हणून कोणीतरी होते त्यांना आदेश दिले आहेत. त्या अगोदर सांगलीतून काही मंडळी येण्यासंदर्भात बातम्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांना पण आम्ही प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. औरंगजेबाच्या कबरीबद्दल बोलताना मिलिंद एकबोटे हे दिसले होते. जिल्हा प्रशासनाकडून औरंगजेबाच्या कबरीबद्दल सावध भूमिका अगोदरच घेतली जातेय.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Aurangazeb#chhatrapatisambhajinagar#DilipSwami
Previous Post

नागपूर दंगलीनंतर NIA चं पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल!

Next Post

हिंजवडी बस आग दुर्घटना, ड्रायव्हरच्या पत्नीचा मोठा दावा!

Next Post
हिंजवडी बस आग दुर्घटना, ड्रायव्हरच्या पत्नीचा मोठा दावा!

हिंजवडी बस आग दुर्घटना, ड्रायव्हरच्या पत्नीचा मोठा दावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.