DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आमिर खानने केले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

भावाच्या खांद्यावर हात ठेवला आणि साश्रू नयनांनी छोट्या लेकाला घट्ट मिठी मारली!

DD News Marathi by DD News Marathi
March 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
आमिर खानने केले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

पुणे प्रतिनिधी :
दि. २४ मार्च २०२५

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. तर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला. त्यांच्या हत्येचे काही फोटोही समोर आले होते. ज्यामध्ये त्यांच्यासोबत किती अमानवीय वागणूक झाली हे दिसत होते. ते पाहून संपूर्ण राज्य हळहळलं होतं.

याप्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरु असून संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करत आहेत. भावाला न्याय मिळावा यासाठी ते आणि मस्साजोग ग्रामस्थ सरकारकडे मागणी करत आहेत. यादरम्यान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमिरने देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे रविवारी (२३ मार्च) दुपारी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम पार पडला. पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होते. यावेळी अमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.

यावेळी आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत त्यांची आणि कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी धनंजय देशमुखांचे डोळे पाणावले होते. आमिर खान यांनी खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला. तसेच, विराज देशमुखला जवळ घेत कडकडून मिठी मारली. यावेळी आमिर खानच्या डोळ्यातही पाणी साठलेलं पाहायला मिळालं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmirKhan#Balewadi#massajog#santoshDeshmukh
Previous Post

एका चुकीनं हिंजवडी हत्याकांडाचा झाला पर्दाफाश!

Next Post

कोण आहे हा कुणाल कामरा? एकनाथ शिंदेंबद्दल वादग्रस्त गाणे सादर!

Next Post
कोण आहे हा कुणाल कामरा? एकनाथ शिंदेंबद्दल वादग्रस्त गाणे सादर!

कोण आहे हा कुणाल कामरा? एकनाथ शिंदेंबद्दल वादग्रस्त गाणे सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.