DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कामराची काहीही चूक नाही! उद्धव ठाकरेंनी घेतली कामराची बाजू!

म्हणाले, त्याने जनभावना मांडली!

DD News Marathi by DD News Marathi
March 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
कामराची काहीही चूक नाही! उद्धव ठाकरेंनी घेतली कामराची बाजू!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २४ मार्च २०२५

कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमात एक गाणं सादर केलं आणि राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजली. त्याचं हे गाणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून असल्याने शिंदे सेना चांगलीच संतापली आणि त्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. त्यानंतर आता शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराने काहीही चुकीचं केलेलं नाही, असं ते म्हणाले.

जे सत्य आहे ती जनभावना त्याने मांडली आहे. जे चोरी करतात ते गद्दार आहेत. मी सर्वप्रथम जनतेला हे स्पष्ट करु इच्छितो की काल कामराच्या तिथे जी तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते कदाचित गद्दार सेनेच्या गटाने केली असेल. सध्या जे राज्य चाललं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललं आहे की गद्दारांच्या आदर्शाने चाललं आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे.

काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरुन त्यांच्या कथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून त्यांनी तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारींनी अपमान केला तेव्हा त्यांचा विरोध करण्याचं धाडस यांच्यात नाही. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं माझं मत नाही, त्याने जनभावना व्यक्त केल्या आहेत. मुख्य म्हणजे, न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं तुम्ही त्यांना नुकसान भरपाई देणार आहात, तसेच, कुणाल कामराने शो केलेल्या ठिकाणाचं ज्याने नुकसान केलं. त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे. या भामट्यांकडून दामदुपटीने वसूल करायला हवं.

सत्य बोलणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला होऊ शकत नाही. हे सत्य आहे. आम्ही उघड बोलतोय हे गद्दार आहेत. उघड उघड चोरी केली त्यांचं काय. मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांचं राज्यात काही चालत नाही, आम्ही वाट्टेल ते करु शकतो, दाखवण्याचा हा प्रयत्न वेळीच चिरडून टाकला पाहिजे.

नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती, औरंगजेबाचं थडगं उकरण्याची सुपारी कोणी दिली. नुसतं सुपाऱ्या सुपाऱ्या करु नका, राज्याची वाट लागत चालली आहे. गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं की देव सुद्धा त्यांचं पद वाचवू शकेल का माहित नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#EknathShinde#kunalKamra#UddhavThackeray
Previous Post

कोण आहे हा कुणाल कामरा? एकनाथ शिंदेंबद्दल वादग्रस्त गाणे सादर!

Next Post

पुण्याच्या भरवस्तीतील लॉजमध्ये ‘भलतेच उद्योग’!

Next Post
पुण्याच्या भरवस्तीतील लॉजमध्ये ‘भलतेच उद्योग’!

पुण्याच्या भरवस्तीतील लॉजमध्ये 'भलतेच उद्योग'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.