DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट करणार!

रांजणगाव ओैद्योगिक वसाहतीत नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाणार.

DD News Marathi by DD News Marathi
March 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट करणार!

पुणे प्रतिनिधी :
दि. २५ मार्च २०२५

पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी शहरातील वेगवेगळ्या भागातून सात कोटी ७६ लाख रुपयांचे ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ रांजणगाव येथील खासगी कंपनीच्या भट्टीत नष्ट केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक, तसेच विविध पोलीस ठाण्यातील तपास पथकांनी कारवाई करुन तस्करांकडून मेफेड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एलएसडी, गांजा असे ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७५८ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालायाचे आदेशानुसार रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीच्या भट्टीत अमली पदार्थ नष्ट करण्यात येणार आहेत. पुणे शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीस पाठविला जातो. मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून गांजाची तस्करी केली जाते. अनेक महाविद्यालयीन युवक गांजाचे व्यसन करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेते, तसेच तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.

गांजाखालोखाल मेफेड्रोनचे व्यसन अनेक तरुण करत असल्याचे उघडकीस आले आहे. मेफेड्रोनच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. वस्ती भागातील अल्पवयीना गांजाच्या आहारी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मेफेड्रोनची तस्करी मुंबईतून केली जाते. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत अर्थकेम लॅबोरटीजवर पुणे पोलिसांनी छापा टाकून कित्येक कोटींचे मेफेड्रोन जप्त केले होते. ही कारवाई पुणे पोलिसांनी केली असल्याने मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पुण्यात करण्यात यावी, असे पत्र पुणे पोलिसांनी ‘एनसीबी’ला नुकतेच दिले. एप्रिल महिन्यात मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

कुरकुंभ मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात दिल्लीतून अटक करण्यात आलेला आरोपी संदीप यादव याने कुरिअरद्वारे ४०० कोटी रुपयांचे २१८ किलो मेफेड्रोन लंडनला पाठविले होते. यादव याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

या प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया, भीमाजी साबळे, युवराज भुजबळ, आयूब मकानदार, संदीपकुमार बसोया, दिवेश भुटानी, संदीप यादव, देवेंद्र यादव, सुनीलचंद्र बम्रन, मोहम्मद कुरेशी, शोएब शेख, सिनथिया उगबाब, अंकिता दास, निशांत मोदी यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे उघडकीस आल्यानंतर तो परदेशात पसार झाला होता. धुनिया हा व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Narcotics#NarcoticsDestructed#PunePolice
Previous Post

पुण्याच्या भरवस्तीतील लॉजमध्ये ‘भलतेच उद्योग’!

Next Post

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.