DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न?

प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यासाठीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर.

DD News Marathi by DD News Marathi
March 25, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र, राजकीय
0
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न?

नागपूर प्रतिनिधी :
दि. २५ मार्च २०२५

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक उत्थानासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा अत्युच्च सन्मान होण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यासाठीचा ठराव आज विधानसभेत एकमताने मंजूर केला गेला.

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या हक्कांसाठी ज्यांनी आवाज उठवला ते महात्मा जोतिबा फुले व आद्य स्त्रीशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक दांपत्याला ‘भारतरत्न’ या देशाच्या अत्युच्च गौरवाने सन्मानित करण्यात यावे, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. दीनदुबळे, कष्टकरी, शेतकरी, महिला अशा सर्व घटकातील पीडितांना आपल्या हक्कांसाठी लढून, ताठ मानेने जगण्याची प्रेरणा ज्यांनी दिली ते महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे.

आज मुलींना शिक्षणाचा समान अधिकार मिळालेला आहे याचे संपूर्ण श्रेय महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. बारा बलुतेदार असो किंवा अठरापगड जाती असो, आज सर्व समाज घटकातील मुलं – मुली उच्च शिक्षणाने पारंगत होऊन उच्च पदांवर काम करून देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. याचे सर्व श्रेय जाते महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना!

अनेक तत्वज्ञ, समाजसेवक, नेते, कार्यकर्ते, विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी केलेले मान्यवर ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन घडले, ते या दांपत्यामुळेच. खरंतर, समाजात क्रांतिकारक बदल घडवून कित्येक पिढ्यांना जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या व भारतीय समाजमनावर निर्विवादपणे अधिराज्य गाजवणाऱ्या या महान दांपत्याला ‘भारतरत्न’ हा गौरव मिळणे म्हणजे ‘भारतरत्न’ या पुरस्काराचा देखील तो सन्मान ठरणार आहे.

महायुती सरकारच्या या ठरावाला विधानभवनातील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bharatratna#maharashtraassembly#MahatmaPhule#SawitribaiPhule
Previous Post

पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट करणार!

Next Post

“राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण.”

Next Post
“राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण.”

"राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.