DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पंढरपुर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात भगीरथ भालके यांचे निवेदन

नगरपालिका क्षेत्रातील प्रस्तावित कामे राज्य शासनामार्फेत करण्याचे वचन

DD News Marathi by DD News Marathi
May 31, 2021
in ताज्या बातम्या
0
पंढरपुर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात भगीरथ भालके यांचे निवेदन

पंढरपुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. ३१ मे २०२१

आज कै.आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापुर जिल्ह्यातील युवा नेते भगीरथ भालके यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळामध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांच्या समस्या  व रेंगाळलेले प्रश्न सोडविण्यासाठी  चे निवेदन नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत पंढरपुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

रूग्णवाहिका व शववाहिका, शहरातील व्यापार्‍यांच्या गाळ्यांचे भाडे आणि नागरिकांचा कर माफीचा प्रस्ताव तात्काळ आयुक्ताकडे देण्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी कबुल करून त्याची प्रत भगीरथ भालके यांना दिली. तसेच 65 एकर येथील हॉस्पिटल मध्ये 50 टक्के बेड नगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय शहरातील दारिद्र रेषेखालील गोरगरीब नागरिक यांना राखीव ठेवण्याचा ठराव ही घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भगीरथ भालके यांनी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना म्हणाले की, ‘पंढरपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न करु शकतो. नगरपालिकेची कोण-कोणती कामे प्रलंबित आहेत त्याची प्रत माझ्याकडे द्या, या विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण न आणता मी ती सर्व कामे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मार्गी लावू शकतो.’

याप्रसंगी विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, प्रशांत शिंदे, सुरेश नेहतराव, लखन चौगुले, महादेव धोत्रे, किरणराज घाडगे, सुधीर धुमाळ, अनिल अभंगराव, महंमद उस्ताद, नागेश गंगेकर, सतीश शिंदे, आप्पा राऊत, संजय बंदपट्टे, स्वागत कदम, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, सतीशबापू घंटे, सुमित शिंदे, शंकर सुरवसे, सागर पडगळ, संतोष बंडगर, स्वप्निल जगताप, तानाजी मोरे, दादा थिटे, सुरज पावले, राजाभाऊ भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

सामाजिक सेवा प्रतिष्ठान व रुपाली वांबुरे यांच्यातर्फे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

अजित पवार यांच्या मामेभावाच्या कंपनीने केला विश्वविक्रम, एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

Next Post
अजित पवार यांच्या मामेभावाच्या कंपनीने केला विश्वविक्रम, एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

अजित पवार यांच्या मामेभावाच्या कंपनीने केला विश्वविक्रम, एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.