DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात वाहन खरेदीचा कहर!

राज्यातील सर्वाधिक वाहन खरेदी पुण्यात.

DD News Marathi by DD News Marathi
March 31, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात वाहन खरेदीचा कहर!

पुणे प्रतिनिधी :
दि. ३१ मार्च २०२५

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला पुण्यात १० हजार १७० वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनखरेदीत तीन हजारांनी वाढ झाली आहे. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी वाढल्याचे दिसून आले आहे.

गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दिवाळी या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी वाहनखरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यासाठी सणाच्या काही दिवस अगोदर वाहनांची नोंदणी करून सणाच्या दिवशी वाहन घरी आणले जाते. या वर्षीदेखील गुढी पाडव्याला वाहनखरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वाहननोंदणी सुरू होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकी, कारसह सर्वच वाहन खरेदीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी पाडव्याच्या मुहुर्तावर सात हजार ३०० वाहनांची खरेदी केली होती. या वर्षी हा आकडा १० हजारांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. सन २०२४मध्ये गुढीपाडव्याला चार हजार २२१ मोटारसायकल खरेदीच्या नोंदी झाल्या होत्या, तर यंदा २०२५मध्ये सहा हजार ५१० नवीन नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दोन हजारांपेक्षा जास्त दुचाकींची खरेदी वाढली आहे.

गत वर्षी २,३२६, तर यंदा २,४२४ कारच्या नोंदी झाल्या. त्यापाठोपाठ रिक्षा खरेदीत वाढ झाली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांत दुपटीने वाढ झाली आहे. बस आणि टॅक्सी या वाहनांच्या खरेदीची संख्याही वाढली आहे.

परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणी
पुणे : ११ हजार ५६
पिंपरी-चिंचवड ६ हजार ६४८
नाशिक : ३ हजार ६२६
मुंबई (मध्य): ३ हजार १५४
ठाणे : ३ हजार

दरम्यान, यंदा २०२५ मध्ये २२ हजार ०८१ चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली. ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात सन २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून, २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता वाहनांची संख्या जेवढी वाढत आहे त्यानुसार इंधनाची मागणी वाढणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #GudiPadva#RecordBreakVehiclePurchase_in_Pune
Previous Post

शहीद तुकाराम ओंबळेंचे स्मारक उभारणार!

Next Post

विमानाने ये-जा करून चोरी करणारा अजब VIP भामटा!

Next Post
विमानाने ये-जा करून चोरी करणारा अजब VIP भामटा!

विमानाने ये-जा करून चोरी करणारा अजब VIP भामटा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.