पुणे प्रतिनिधीः
विरार शहरातील वल्लभ रुग्णालयात आग लागून झालेल्या दुर्घटनेत १३ रुग्णांचा मुत्यू झाला आहे. या घटनेची दखल घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
विरार येथील वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र, मध्यरात्री एसीचा स्फोट झाला,त्यामूळे १३ रुग्णांचा होरपळून मुत्यू झाला. तर ५ रुग्णांना दुस-या हॅास्पिटल मध्ये हलविण्यात आले. या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
या दूर्देवी घटनेबाबत अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, सर्वसामान्यांमध्ये ही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.