DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

हर्षवर्धन सपकाळांनी पुण्यातल्या आपल्या ४ शिलेदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली!

कॉंग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार?

DD News Marathi by DD News Marathi
March 31, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
हर्षवर्धन सपकाळांनी पुण्यातल्या आपल्या ४ शिलेदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली!

पुणे प्रतिनिधी :
दि. ३१ मार्च २०२५

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात संघटनात्मक बदल प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या बदलामध्ये पुण्यातील प्रमुख चार शिलेदारांवर हर्षवर्धन सपकाळांनी मोठी जबाबदारी सुपूर्द केली आहे. यामध्ये काँग्रेस नेते अभय छाजेड, मोहन जोशींसह चौघांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेस आपला तोच परफॉर्मन्स कायम ठेवेल, असे बोलले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील काठावर निवडून आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये बदल होणार हे निश्चित होतं. त्यानुसार प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झाली आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

आता प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमून त्या जिल्ह्यात काँग्रेसची नक्की परिस्थिती काय आहे, याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायचा आहे. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनेची ताकद, गटबाजी, निवडणूक जिंकण्याची क्षमता या सगळ्या बाबींवर हा अहवाल असणार आहे. हा अहवाल पाहून झाल्यानंतर राज्यभरात आधी मंडल, नंतर शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.

या बदलामध्ये पुण्यातील प्रमुख चार शिलेदारांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जुन्या, विश्वासू सहकाऱ्यांवरच विश्वास दाखवला आहे. यामध्ये अभय छाजेड यांच्यावर लातूर, मोहन जोशींवर सोलापूर, संजय बालगुडेंवर कोल्हापूर आणि रमेश बागवे यांच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AbhayChhajed#INC#MohanJoshi#RameshBagwe#SanjayBalgudeharshavardhanSapkal
Previous Post

विमानाने ये-जा करून चोरी करणारा अजब VIP भामटा!

Next Post

नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठीच….

Next Post
नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठीच….

नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठीच....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.