DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता, जर…”

उद्धव ठाकरेंची तिखट प्रतिक्रिया.

DD News Marathi by DD News Marathi
April 3, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता, जर…”

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ एप्रिल २०२५

वक्फ बिल सुधारणा विधेयकावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आम्हाला हिंदुत्त्व सोडलं म्हणणाऱ्या गद्दारांनी कालची भाषणं ऐकताना लाजा सोडल्या होत्या का असा? असं म्हणत ठाकरेंनी शिंदे सेनेवर घणाघाती टीका केली. त्यासोबतच अमेरिकेने वाढवलेल्या कराच्या मुद्द्यावरूही केंद्र सरकारवर निशाणा साधला. जर मोदींनी विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर एकमुखाने पाठिंबा दिला असता, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपल्या सर्वांना आठवत असेल अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी एक महिन्याआधी इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावेत नाहीतर आम्हीसु्द्धा जशात तसे करू. त्या कराच्या आकरणीला त्यांनी सुरूवात केली आहे. शेअर मार्केट कोसळले अशी बातमी आहे. मला अशी अपेक्षा होती की देशाच्या आर्थिक स्थितीचा हा विषय आहे. देशावर आर्थिक संकट आदळेल की काय अशी परिस्थिती असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री आणि देशाच्या परराष्ट्र मत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवत देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. या संकटाचा आपण कसा प्रतिकार करणार आहोत, काय पाऊल उचलण्याची गरज आहे? मी मुख्यमंत्री असताना चीन आपल्या अरूणाचल भागामध्ये घुसला होता. तेव्हा कोरोनाचा काळ होता, मोदींनी व्हिडीओ कॉन्फरंसिंग घेतली होती. तेव्हा सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतलं होतं. त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं होतं की, देशाचे पंतप्रधान आहात, देशाच्या हिताचे निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. आताही जे येणारे आर्थित संकट आहे त्याबद्दल विश्वासात घेत हे सांगितलं असतं तर आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता. पण आता असं वाटत आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं कारण आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला देऊ शकत नाही आणि अमेरिका फार दूर राहिली. त्यामुळे आता ते जे करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही. किमान आजतरी लोकसभा आणि राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवत आर्थिक संकटाबद्दल देशाला शासकीय भाषेत अवगत केलं पाहिजे. पण त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं ठरेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ईद झाली, या सगळ्यांनी ईदच्या मेजवानी झोडल्या आता ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आहे. एक योगायोग असा आहे की मंत्री किरेन रिजिजू यांनी बिल मांडलं, ज्यांनी आधी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या असं विकृत राजकारण भाजप करतं. वक्फ बोर्डाच्या काही सुधारणा चांगल्या आहेत पण भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

कलम ३७० रद्द झाल्यावर कश्मिरी पंडितांना घरे मिळालीत का? मुस्लिमांचा जिन्हांहूनही अधिक कळवळा काल भाजपच्या नेत्यांना होता. गद्दारांचं म्हणणं आहे की, आम्ही हिंदुत्त्व सोडलं मग काल जी काही भाषणे सुरू होती तेव्हा तुम्ही लाज सोडली होतीत का? आम्हाला हे मान्य नाही असे का बोलला नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची शिंदे सेनेवरही निशाणा साधला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #EknathShinde#NarendraModi#UddhavThackeray#WaqfAmendmentBill
Previous Post

दिशा सालियनचा मृत्यू पूर्वनियोजित मर्डरच?

Next Post

पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणारी अभिनेत्री काय बोलली?

Next Post
पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणारी अभिनेत्री काय बोलली?

पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणारी अभिनेत्री काय बोलली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.