डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०७ एप्रिल २०२५
‘मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी रूपये देणार होते.’, असा गंभीर आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. पुढे करूणा शर्मा यांनी असाही दावा केला की, महाराष्ट्रात असं कोणी असेल जो करूणा मुंडे हिला त्याच्या प्रेमात अडकून फसवेल आणि लग्न करेल, अशा व्यक्तीला धनंजय मुंडे यांचे दलाल राज घनवट, पुरषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर हे लोकं २० कोटी रूपये देतील. तर धनंजय मुंडे यांनी राज घनवट, पुरषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर यासारखे दलाल लोकं पाळली आहेत. हे पाळलेले दलाल धनंजय मुंडे यांना दारू आणि मुली पुरवत असल्याचा गंभीर आरोपही करूणा शर्मा यांनी केला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलतना करूणा शर्मा यांनी त्या धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावाही केला.