DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

लग्नासाठी धमक्यांना घाबरून मुलीने जीवन संपवलं!

बारामतीत हृदयद्रावक घटना.

DD News Marathi by DD News Marathi
April 11, 2025
in महाराष्ट्र
0
लग्नासाठी धमक्यांना घाबरून मुलीने जीवन संपवलं!

बारामती प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२५

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. गावातील तरूणाच्या त्रासाने मुलीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या केलेल्या मुलीने आता गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा दिली होती. मुलीच्या आई-वडिलांना आरोपीने मारण्याची धमकी दिली होती. गेले अनेक महिने आरोपी हा मुलीला मानसिक त्रास देत होता. घरच्यांना न सांगता मुलीने टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे.तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे यांच्या साथीने गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.

७ एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Baramati#StopSuicide#Suicide#TeenageSuicide
Previous Post

आपला संबंध नसल्याचा वाल्मिक कराडचा अर्जामध्ये मोठा दावा!

Next Post

‘शिवशाही’चा प्रवास होतोय अत्यंत ‘ताप’दायक!

Next Post
‘शिवशाही’चा प्रवास होतोय अत्यंत ‘ताप’दायक!

'शिवशाही'चा प्रवास होतोय अत्यंत 'ताप'दायक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.