DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

धनंजय मुंडे झाले पुन्हा सक्रिय!

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाकरिता कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना सूचना.

DD News Marathi by DD News Marathi
April 15, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
धनंजय मुंडे झाले पुन्हा सक्रिय!

बीड प्रतिनिधी :
दि. १५ एप्रिल २०२५

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले. आपल्या मतदार संघातील विकास कामांची पाहाणी करताना आमदार धनंजय मुंडे दिसून आले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी, वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेल्या २८६ कोटी रुपयांतून सुरू असलेल्या विविध कामांची, माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या समवेत पाहाणी केली.

मंदिर परिसरात भव्य दर्शन मंडपाचे काम सुरू असून आता चौथ्या मजल्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी Glass Re-In-Forced काँक्रीट पद्धतीने काम पूर्ण करावे, दगडी पायऱ्यांचे काम तसेच परिसरातील अन्य वस्तूंच्या कामाच्या संदर्भात पुरातन महत्व जपून तसेच दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केले जावे, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी २८६.६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून यातून आतापर्यंत एका भव्य अशा भक्त निवासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रदक्षिणामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून, भव्य असे प्रवेशद्वार, दगडी पायऱ्या, दर्शन मंडप अशी कामे सध्या सुरू आहेत. मंदिर परिसरातील वास्तूंचे पुरातन महत्व जपण्याबरोबरच दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधितांना केल्या.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तसेच खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांनी विधानसभेच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचदरम्यान धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. त्यामुळे, विरोधकांच्या प्रचंड दबाव आणि आक्रमकतेमुळे धनंजय मुंडे यांना नाईलाजाने आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#dhananjaymunde#massajog#TwelveJyotirlingas#Vaidyanath#WalmikKarad
Previous Post

तीन दिवस नाग घरात ठाण मांडून बसला!

Next Post

राज्यात तीन बडे नेते एकत्र येणार?

Next Post
राज्यात तीन बडे नेते एकत्र येणार?

राज्यात तीन बडे नेते एकत्र येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.