DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मी १२०० फूट खोल खाणीत चाललोय!

पुण्याचे व्यावसायिक लक्ष्मण शिंदेंच्या हत्येचं गूढ उकललं!

DD News Marathi by DD News Marathi
April 16, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मी १२०० फूट खोल खाणीत चाललोय!

पुणे प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२५

पुण्यातील व्यावसायिकाला व्यवसायाच्या निमित्ताने पाटण्यात बोलावल्यानंतर, त्यांचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, व्यावसायिकाशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी कोथरूड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. कोथरूड पोलिसांचे पथक तपासासाठी पाटण्यात गेल्यानंतर अपहरण व खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लक्ष्मण साधू शिंदे (५५, रा. डीपी रोड, कोथरूड) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणात पाटणा येथील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे व्यवसायिक होते. त्यांचा खेडशिवापूर येथे ‘सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग’चा व्यवसाय होता. व्यवसायाच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या राज्यांत जात होते. त्यांचा बिहारमधील काही व्यक्तींशी व्यवसायाच्या निमित्ताने संपर्क झाला होता. त्या व्यक्तींनी शिंदे यांना पाटण्यात बोलावले होते.

शिवराज सागी या व्यक्तीशी त्यांचे फोन व ई-मेलद्वारे बोलणे झाले होते. त्याने निमंत्रण दिल्याने शिंदे ११ एप्रिल रोजी विमानाने पाटणा येथे गेले होते. लक्ष्मण शिंदे यांच्या खून प्रकरणात काही संशयितांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही टोळी असण्याची शक्यता आहे.

पाटणा येथे गेल्यानंतर त्यांचा मुलीशी संवाद झाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मण शिंदे यांच्या मोबाइलवरून ‘मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे,’ असा मेसेज त्यांच्या मुलीला आला होता. ही खाण १२०० फूट जमिनी खाली असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले होते.

दरम्यान, त्यानंतर कुटुंबीयांनी संपर्क साधला असता, शिंदे यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे कुटुंबाने कोथरूड पोलिस ठाण्यात १२ एप्रिलला मिसिंगची तक्रार दाखल केली. कोथरूड पोलिसांचे पथक पाटणा येथे गेले असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला.

‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी आहेत. १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे,’ अशी बतावणी आरोपींनी केली होती. लक्ष्मण शिंदे यांच्या खून प्रकरणात काही संशयितांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार ही टोळी असण्याची शक्यता असून, त्यांची गुन्हा करण्याची पद्धत मोठ्या व्यावसायिकांना बहाणा करून बोलावणे, तिथे आल्यानंतर त्यांना लुटणे; तसेच त्यांच्याकडील रक्कम काढून घेऊन त्यांची हत्या करणे अशी असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DDNewsMarathi#Patna#PuneBusinessmanMurdered#डीडीन्यूजमराठी
Previous Post

मुंबईत रात्री बाईकस्वाराला लुटले!

Next Post

प्रवाशांची गयावया. अरे चेतन हळू चालव ना!

Next Post
प्रवाशांची गयावया. अरे चेतन हळू चालव ना!

प्रवाशांची गयावया. अरे चेतन हळू चालव ना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.