DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंबई महापालिकेने विलेपार्लेतील ९० वर्षे जुने जैन मंदिर पाडले!

विलेपार्लेमध्ये सर्व पक्षीय निषेध रॅली काढण्यात आली.

DD News Marathi by DD News Marathi
April 19, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मुंबई महापालिकेने विलेपार्लेतील ९० वर्षे जुने जैन मंदिर पाडले!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२५

मुंबईच्या विलेपार्ले येथील कांबळीवाडी येथील ९० वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी मुंबई महानगरपालिकेने पाडले. या घटनेमुळे देशभरात जैन समुदाय संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या विरोधात आज(१९ एप्रिल) सकाळी ९:३० वाजता अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आणि जैन समाजाचे संत सहभागी झाले.

मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे.

केंद्रात भाजपा आणि महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आहे, त्यानंतर सध्या त्याची जबाबदारी सरकारकडे आहे. मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने व्यवस्थापन समितीला नोटीस बजावली होती. या विरोधात जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार होती, परंतु त्याआधी बुधवारी BMCच्या पथकाकडून मंदिर पाडण्यात आले.

जैन समाजाच्या वतीने असे म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयानंतर BMC प्रशासनाने कारवाई करायला हवी होती. मंदिराचे विश्वस्त अनिल शाह म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल केली आहे हे BMC ला माहित होते, परंतु BMC प्रशासनाने घाईघाईने मंदिर पाडले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. अनिल शाह म्हणाले की, जैन बांधव आज मंदिर पाडण्याच्या विरोधात अहिंसक निषेध करतील. या निषेधापूर्वी, जैन बांधवांनी ज्या मंदिरात ही कारवाई करण्यात आली होती तिथे आरती केली. याशिवाय, हे मंदिर कोणाच्या आदेशाने पाडण्यात आले असा प्रश्न जैन बांधवांनी विचारला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BJP#BMC#JainMandir#Vileparle
Previous Post

शाहरुखच्या बायकोच्या हॉटेलात बनावट पनीर असल्याचा दावा!

Next Post

सुनील गावस्कर यांची संपत्ती आहे किती?

Next Post
सुनील गावस्कर यांची संपत्ती आहे किती?

सुनील गावस्कर यांची संपत्ती आहे किती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.