डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०५ मे २०२५
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल आज, सोमवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी सकाळी निकालाची तारीख जाहीर केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.