शिरूर प्रतिनिधी : अभिजीत आंबेकर
दि. ०८ मे २०२५
शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेले प्रभु श्री रामलिंग महाराज यांचे मंदीर वज्रलेपा साठी दिनांक २ मे ते ९ मे पर्यंत बंद आहे. श्री रामलिंग महाराज मंदिरातील पुरातन काळातील शिव पिंडीला प्रथमच वज्रलेप करण्यात आलेला आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती रामलिंग देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे यांनी दिली.
शुक्रवार दि. ९ मे रोजी सकाळी ११ ते ५ वा.: होमहवन व प्राणप्रतिष्ठा भव्यदिव्य सोहळा, सायं. ५.३० ते ७.३० वा. : विद्यावाचस्पती ह.भ.प.डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांचे सुश्राव्य हरीकीर्तन तसेच रात्री ८.०० नंतर महाप्रसाद व भाविक भक्तांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल असे दसगुडे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट’ यांनी केले आहे. या वेळी श्री रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष ,प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल, सहसचिव तुळशीराम परदेशी, विश्वस्त गोधाजी घावटे, रावसाहेब घावटे, वाल्मिकराव कुरुंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेव घावटे, सल्लागार जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डिले आदी उपस्थित राहाणार आहेत.