DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

पण भारताकडून मिसाईलच्या रूपात मिळालं असा गिफ्ट.

DD News Marathi by DD News Marathi
May 9, 2025
in ताज्या बातम्या
0
बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ मे २०२५

रवीना टंडन ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून ९०च्या दशकात तिनं बॉलिवूडवर राज्य केलंय. इतकंच नव्हे तर ९०च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक होती. पण रवीनाबद्दल एक मनोरंजक गोष्ट तुम्हाला माहितीये का? ही कथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, कारगिल युद्ध आणि बॉम्बशी संबंधित आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एकदा एका मुलाखतीत खुलासा केला होता की, रवीना टंडन ही त्यांची आवडती अभिनेत्री आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वर्षांनी १९९१ मध्ये कारगिल युद्ध झालं. या काळात भारतीय सैनिकांनी काही बॉम्बवर ‘फॉर नवाज शरीफ फ्रॉम रवीना टंडन’ असं लिहिलं. त्यासोबत त्यावर एक हार्टसुद्धा बनवण्यात आलेलं. हे बॉम्ब युद्धात पाकिस्तानविरुद्ध वापरायचे होते. जेव्हा या बॉम्बचे फोटो वर्तमानपत्रात आले तेव्हा जनतेनं भारतीय सैनिकांच्या या कृतीचं खूप कौतुक केलं.

या घटनेनंतर काही वर्षांनी, रवीना टंडनने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतं. अभिनेत्रीने बॉम्बवर तिचं नाव लिहिल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते फोटो रवीनाने नंतर पाहिल्याचं तिनं सांगितलं. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, युद्धाऐवजी वाटाघाटीचा पर्याय निवडण्याचा सल्ला ती देईल. त्याचबरोबर रवीना असंही म्हणाली की, जर तिला तिच्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर उभं राहावं लागलं तर ती मनापासून आणि धैर्याने सगळं करेल.

त्याचबरोबर रवीनाने यूपी पोलिसांच्या “बियॉन्ड द बॅज” या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की, ‘मला आयपीएस व्हायचं होतं. मी त्यावेळी किरण बेदींची फॅन होते. त्या खूप धाडसी व्यक्तिमत्वाच्या होत्या. आम्ही त्यांच्या गोष्टी ऐकायचो, म्हणून मी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायचे आणि म्हणायचे की पदवीनंतर मी आयपीएस होईन. पण आता चित्रपटांच्या आयुष्यात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळते.’

दरम्यान, रवीना टंडनच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिनं ‘मोहरा’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘जिद्दी’, ‘लाडला’, ‘दमन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘दुल्हे राजा’, ‘शूल’ आणि ‘केजीएफ 2’ यांसह अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #IndiaPakWar#Kargil#NawazSharif#RavinaTandon
Previous Post

कर्नल सोफिया कुरेशी यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात होती!

Next Post

पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

Next Post
पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

May 9, 2025
पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

May 9, 2025
बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

May 9, 2025
कर्नल सोफिया कुरेशी यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात होती!

कर्नल सोफिया कुरेशी यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात होती!

May 9, 2025
शिरूरमधील श्री रामलिंग महाराज मंदिरातील पुरातन काळातील शिव पिंडीला प्रथमच वज्रलेप!

शिरूरमधील श्री रामलिंग महाराज मंदिरातील पुरातन काळातील शिव पिंडीला प्रथमच वज्रलेप!

May 8, 2025
अंगावरची हळद ओली असतानाच बॉर्डरवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल!

अंगावरची हळद ओली असतानाच बॉर्डरवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल!

May 8, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.