छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : अखलाख देशमुख
दि. ०९ मे २०२५
महाराणा प्रताप म्हणजे त्याग, सेवा, समर्पणाचे उत्तम उदाहरण. साहस, पराक्रम आणि शौर्याच्या बळावर त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष मा. शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली आज महाराणा प्रताप यांच्या 485 व्या जयंती निमित्त महाराणा प्रताप उद्यान, कॅनॉट प्लेस येथे त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक इक्बालसिंग गिल, शहर जिल्हा काँग्रेस चे महासचिव अनिस पटेल संतोष भिंगारे, कैसर बाबा, इंजि. विशाल बन्सवाल, अनिता ताई भंडारी, एकनाथ त्रिभुवन, अशोक डोळस, पप्पूराज ठुबे, रमाकांत गायकवाड, शेख रईस, दिलीप भोसले, योगेश थोरात यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.