नांदेड प्रतिनिधी : मनोज मनपुर्वे
दि. १२ मे २०२५
नांदेड रेल्वे स्थानक ते मध्यवर्ती बस स्थानक रस्त्याचे काम सुरू असल्याने महिन्याभरापूर्वी नांदेड मध्यवर्ती बस स्थानक कौठा भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच बस स्थानक म्हणून प्रवाशांना ज्या सुविधा लागतात ते देण्यासाठी प्रशासन अपयशी ठरलं आहे. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कौठा भागातील स्थलांतरित बस स्थानकात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बस अक्षरशः रस्त्यावर लागत असल्याने कोणती बस कुठे जाते हे सुद्धा प्रवाशांना कळायला मार्ग राहिला नाही, अनेक प्रवासी बस स्थानक परिसरात गावी जाण्यासाठी एसटी बस शोधताना पाहायला मिळतात मात्र बस मिळत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.