DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला भेट!

आदिवासी महिला व पुरुष बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त.

DD News Marathi by DD News Marathi
May 27, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला भेट!

नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २६ मे २०२५ :

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव, वरिष्ठ I.A.S. अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक यांनी सोमवारी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत नागपूर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालय परिसरातील गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अपर आयुक्त आयुषि सिंह (I.A.S.), उपायुक्त डीगांबर चव्हाण, कार्यकारी अभियंता उज्ज्वल डाबे, सह आयुक्त बबिता गिरी, दिनेश शेराम (सिनेट मेंबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), समन्वयक स्वप्नील मसराम, उपाध्यक्ष विजय परतीके (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद) आणि सामाजिक कार्यकर्ते निखिल सातपुते उपस्थित होते.श्रीमती सौनिक यांचे गोंडी पेंटिंग भेट देऊन स्वागत करण्यात आले. स्वप्नील मसराम यांनी गोंडी चित्रकलेची माहिती देताना सांगितले की, ही कला मध्य भारत, विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नागपुरात गोंडी चित्रकला आणण्याचे श्रेय गोंड राजे बक्त बुलंद शहा यांना जाते. ही चित्रकला नैसर्गिक किंवा अक्रेलिक रंगांचे थर लावून तयार केली जाते, जी आदिवासी जीवन, निसर्ग, पशु-पक्षी आणि वनस्पतींचे नाते दर्शवते. आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने ही कला दुबईतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पोहोचली असून, कलाकारांना रोजगार मिळाला आहे. गोंडी चित्रकलेने सजवलेले जॅकेट विशेष लोकप्रिय झाले आहेत.श्रीमती सौनिक यांनी गोंडी चित्रकलेचे कौतुक करत शासकीय पातळीवर मदत करण्याचे आश्वासन दिले आणि एक गोंडी जॅकेट खरेदी केले. तसेच, गोंड राणी हिराई आत्राम विक्री केंद्रात आदिवासी महिला व पुरुष बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AtramVikriKendra#DDNewsMarathi#GondSamaj#Maharashtra#SujataSainik#डीडीन्यूजमराठी
Previous Post

नागपूर मेट्रोमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे कलाकौशल्याचे सादरीकरण!

Next Post

चांपा-हळदगांव-परसोडी-सायकी रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

Next Post
चांपा-हळदगांव-परसोडी-सायकी रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

चांपा-हळदगांव-परसोडी-सायकी रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंची ‘वर्षा’वर फडणवीसांशी गुप्त चर्चा!

बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंची ‘वर्षा’वर फडणवीसांशी गुप्त चर्चा!

August 21, 2025
आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

August 20, 2025
ठाकरे बंधूंच्या युतीचा फज्जा, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा नाही!

ठाकरे बंधूंच्या युतीचा फज्जा, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा नाही!

August 20, 2025
कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला जोरदार धक्का!

कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला जोरदार धक्का!

August 20, 2025
सणासुदीच्या तोंडावर सोनं खरेदीदारांना दिलासा!

सणासुदीच्या तोंडावर सोनं खरेदीदारांना दिलासा!

August 20, 2025
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश!

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश!

August 20, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.