DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चांपा-हळदगांव-परसोडी-सायकी रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

सरपंच अतिश पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे ४० टन क्षमतेचा सिमेंट रस्त्याची मागणी.

DD News Marathi by DD News Marathi
May 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
चांपा-हळदगांव-परसोडी-सायकी रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

चांपा प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २७ मे २०२५

उमरेड तहसीलमधील चांपा, हळदगांव, परसोडी आणि सायकी परिसराला उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या ८ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर ४० टन क्षमतेचा सिमेंट रस्ता बांधण्याच्या मागणीसाठी चांपा येथील माजी सरपंच अतिश पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिकांना अपघात, धूळ आणि आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.या परिसरात असलेल्या डझनभर क्रशर प्लांटमुळे ओव्हरलोडेड ट्रक आणि टिप्परची सतत वाहतूक सुरू असते, ज्यामुळे रस्त्यावर खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचाविकार आणि डोळ्यांचे आजार वाढले आहेत. शेतकरी पुष्कर बुट्टी यांनी सांगितले की, क्रशर प्लांटमधून निघणारी धूळ आणि ओव्हरलोड वाहनांमुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हळदगांवचे सरपंच गोविंदा हाते यांनी सांगितले की, सर्व ग्रामपंचायतींनी सिमेंट रस्त्याच्या बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव शासन दरबारी दिला आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. माजी सरपंच अतिश पवार यांनी नमूद केले की, क्रशर प्लांटमुळे खनिकर्म विभागाला कोट्यवधींचा महसूल मिळतो, तो या रस्त्याच्या विकासासाठी वापरला जावा. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही समस्येचे निराकरण झालेले नाही.

ग्रामस्थांनी प्रशासनाला लवकरात लवकर चांपा – हळदगाव – परसोडी – सायकी रस्त्याचे सिमेंटकरण करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बहिष्काराचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा दिला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Champa#ChandrashekharBawankule#Crusher#DevendraFadnavis#NitinGadkari#Umred
Previous Post

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला भेट!

Next Post

गुजरातच्या तस्कराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पकडले!

Next Post
गुजरातच्या तस्कराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पकडले!

गुजरातच्या तस्कराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पकडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.