DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गुजरातच्या तस्कराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पकडले!

तब्बल आठ किलो गांजा जप्त.

DD News Marathi by DD News Marathi
May 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
गुजरातच्या तस्कराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पकडले!

कल्याण प्रतिनिधी :
दि. २७ मे २०२५

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी म्हणून आलेल्या एका संशयास्पद प्रवाशाची रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सोमवारी तपासणी केली. त्यावेळी त्या प्रवाशाजवळील पिशवीत आठ किलो वजनाचा लाखो रूपयांचा गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला. हा इसम गुजरातमधील रहिवासी आहे. या गांजाची बाजारातील किंमत लाखो रूपयांची आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सांगितले.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवरून लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस सुटतात. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून देशाच्या विविध भागातून प्रवासी येत असतात. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट पाच ते सातवर सुरक्षा बलाचे पोलीस सतत तैनात असतात. सोमवारी दुपारी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवर तैनात होते. या फलाटावर एक इसम प्रवासी म्हणून फिरत असल्याचे दिसले. तो फलाटावर येणाऱ्या कोणत्याही मेल/एक्सप्रेसमध्ये चढत नव्हता.

हा प्रवासी कोठेही जात नाही. तो बराच वेळ फलाटावर रेंगाळत असल्याने लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना संशय आला. त्याच्याजवळ प्रवासी वाहतुकीची मोठी पिवशी होती. हा प्रवासी संशयास्पद वाटत असल्याने जवानांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याची तपासणी करण्याचे जवानांनी ठरवले. एक जवान फलाट क्रमांक सातवर घुटमळणाऱ्या संशयास्पद प्रवाशाजवळ गेला. त्याने , आपले नाव काय आहे? आपणास कुठे जायचे? आपण कुठून आला आहात? असे प्रश्न केले. त्यावेळी संबंधित संशयास्पद इसम गांगरला. तो पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.

नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (३४) असे नाव या इसमाने पोलिसांना सांगितले आणि आपण गुजरात येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नरेशकुमार पंचोली या इसमाला ताब्यात घेतले. त्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या दालनात नेले. तेथे त्याची कसून चौकशी आणि तपासणी केली. त्यांच्या पिशवीत ८ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा अंमली पदार्थांची तस्करी करणारा असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा नोंदवून अटक केली.

ही कारवाई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अरूण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद जगताप, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक गौरीशंकर एडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील आणि पथकाने केली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Cannabis#Hemp#KalyanRailway#RailwayPolice
Previous Post

चांपा-हळदगांव-परसोडी-सायकी रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!

Next Post

आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव!

Next Post
आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव!

आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.