DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महापुरुषांचा विचार ढणढणत ठेवायचा असेल तर चुलीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतील! – आमदार सिद्धार्थ खरात.

75 बौद्ध नव वधू वरांचा परिचय मेळावा उत्साहात संपन्न.

DD News Marathi by DD News Marathi
May 28, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
महापुरुषांचा विचार ढणढणत ठेवायचा असेल तर चुलीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतील! – आमदार सिद्धार्थ खरात.

बुलडाणा प्रतिनिधी : सतीश पैठणे

दि. २८ मे २०२५

डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे यश सिद्धी सैनिक सेवा संघ, ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व रमाई च्या लेकी समुहाच्या वतीने स्मृतीशेष रंगनाथ डोंगरदिवे (दादा साहेब) यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने बौद्ध वधू वर परिचय मेळावा भरघोस प्रतिसादातून यशस्वी पणे संपन्न झाला, कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्रचे मा. संचालक कर्नल सुहास जतकर हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ऍड. सुमित सरदार, मा जि. प. सदस्य हे उपस्थित होते.

आमदार सिद्धार्थ खरात उद्घाटन प्रसंगी बोलत असताना म्हणाले की ऐच्छिक स्थळ मिळत नसल्याने समाजाची अनेक वयस्कर मुले मुली अजून लग्नाची बाकी आहेत. त्यामुळे बौद्ध वधू वर परिचय मेळावा सारख्या सामाजिक कार्यक्रमांची आज खूप गरज आहे. तसेच यश सिद्धी सैनिक सेवा संघ व संस्थापक अनिल डोंगरदिवे यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. नाहीतर काही लोक निवृत्त होतात आणि घरात परिवारात गुंतून जात घरी बसतात. जे जीवंत आहेत ते स्वतः चळवळी ला समर्पित होतात असे समाजशील लोकांमुळे चळवळ आज जिवन्त आहे. यामुळे च आपला समाज प्रगती करू शकला जर प्रत्येक जण घरीच बसला तर ही चळवळ लयास जाईल, असं आश्वस्त मत व्यक्त करीत त्यांनी यश सिद्धी सैनिक सेवा संघ ने महार रेजिमेंट चा स्थापना दिवस साजरा केला. असा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही. इतका नियोजन बद्ध, शिस्त बद्ध कार्यक्रम फक्त यश सिद्धी सैनिक सेवा संघ च करू शकतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ते पुढे म्हणाले, आपल्याला समता मूलक समाज निर्माण करायचा आहे, मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाईक आहे,आणि या विचारासाठी मी सदैव समर्पित राहील. तसेच जिथे समाजावर अन्याय होईल तिथे सिद्धार्थ खरात पोहचेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कर्नल सुहास जतकर यांनी वधू वर परिचय मेळावा किती महत्त्वाचा आहे याची अनेक उदाहरणे देऊन आपले मत व्यक्त केले. तसेच यश सिद्धी सैनिक सेवा संघ म्हणजेच एक चमत्कारिक संघ आहे. ज्या उपक्रम किंवा कार्यक्रमाला यश सिद्धी सैनिक सेवा संघ हाती घेतो तो कार्यक्रम यशस्वी होतोच. यश आणि यश सिद्धी सैनिक सेवा संघ हे एक समीकरण बनलं आहे. आजचा कार्यक्रमही तसाच भरगच्च यशस्वी झाला. मी नेहमीच यश सिद्धी सैनिक सेवा संघा सोबत आहे असं मत ऍड. सुमित सरदार साहेब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम च्या दुसऱ्या सत्रात, वधू, वर यांचे बायोडाटा घेतलेल्या मुला मुलींनी आपला परिचय दिला, अश्या जवळ पास 75 विवाह इच्छुक मुला मुलींनी आपला परिचय दिला.
कार्यक्रम चे सूत्र संचलन मुख्य आयोजक अनिल डोंगरदिवे यांनी तर प्रास्ताविक ऋणानुबंध समाज विकास संस्थेचे प्रशांत डोंगरदिवे तर विलास बोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रदीप मघाडे, सिद्धार्थ मिसाळ, गुलाब मिसाळ,मधुकर खरे, विजय राऊत,गणेश साळवे,मदन बिबे,भारत जाधव, संजय ससाणे, विशाल घेवंन्दे,विलास जाधव, वामन खरात,कॅप्टन नंदकिशोर ढाकरके, कॅप्टन श्रीराम जाधव,विद्यासागर डोंगरदिवे,कॅप्टन रमेश भुसारी, दिलीप खिल्लारे,राजू पवार, बी जी मगर, समाधान मोरे,मधुकर जाधव,शंकर हिवाळे,बाबुराव साळवे,श्रीकृष्ण तायडे,मधुकर निकाळजे,शेषराव खरात,विलास बोर्डे,अनिल इंगळे, जोगदंड इत्यादीनी परिश्रम घेतले

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Buldana#MangalParinay#SiddharthKharat
Previous Post

आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव!

Next Post

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक!

Next Post
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक!

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.