DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत!

कॅफे बाहेरील गाड्यांची तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण.

DD News Marathi by DD News Marathi
May 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत!

पुणे प्रतिनिधी :
दि. २९ मे २०२५

पुण्यातील डी. पी. रोडवर २७ मे रोजी रात्री १२ वाजता एका कॅफेसमोर तीन तरुणांनी दहशत माजवली. तोंडाला रुमाल बांधून हातात कोयते आणि पालघनसारखी हत्यारे घेऊन त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर तीन दिवस उलटूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, त्यामुळे या घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी तरुण दुचाकीवरून कॅफेजवळ आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते आणि त्यांच्या हातात कोयता व इतर धारदार शस्त्रे होती. त्यांनी फक्त दीड मिनिटात कॅफेमध्ये प्रवेश केला आणि लगेच बाहेर येऊन गाड्यांवर हल्ला केला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड केली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर तीन दिवस झाले तरी, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. “ना गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ना पोलिसांकडून कोणती कारवाई झाली आहे,” त्यामुळे या प्रकरणातील मूळ कारण काय आहे हे अजून समजू शकलेले नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. तरीही, पोलिसांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कॅफेच्या मालकाने देखील तक्रार दाखल केली आहे की नाही, याची माहिती समोर आलेली नाही. यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आणि भीती पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास कधी सुरू करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #cafe#DPRoad#KoytaGangPune
Previous Post

पुण्यात भाजप आमदार भीमराव तपकिरांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न!

Next Post

वैष्णवी कस्पटे (हगवणे) प्रकरणात कुटुंबियांच्या वकिलावर संतापला अभिनेता हेमंत ढोमे!

Next Post
वैष्णवी कस्पटे (हगवणे) प्रकरणात कुटुंबियांच्या वकिलावर संतापला अभिनेता हेमंत ढोमे!

वैष्णवी कस्पटे (हगवणे) प्रकरणात कुटुंबियांच्या वकिलावर संतापला अभिनेता हेमंत ढोमे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.